नोएडा येथे 31 ऑगस्टपर्यंत सिनेमागृह, व्यायाम शाळा, जलतरण तलाव आणि करमणूक उद्याने बंद ठेवण्यात येणार आहे. एएनआयचे ट्वीट- 

  

झारखंडमध्ये 826 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.  तर 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


 

कर्नाटकचे मंत्री बी. सी. पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

 

कर्नाटकचे मंत्री बी. सी. पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

 

ईद-उल-अजहासाठी मुंबई महानगरपालिकेने नवीन निर्देश जारी केले आहेत. 1 तारखेपासून तर, 3 तारखेपर्यंत एका दिवसाला केवळ 150 धार्मिक बळींना परवानगी देण्यात आली आहे. एएनआयचे ट्विट- 

 

हिमाचल प्रदेशमधील कोरोनाबाधितांचा आकडा 2 हजार 564 वर गेला आहे. यापैकी 1 हजार 459 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 12 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आता 1 हजार 76 ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. एएनआयचे ट्वीट- 

 

गोव्यात कोरोनाचे आणखी 209 रुग्ण आढळून आल्याने आकडा 5913 वर पोहचला आहे.

गुजरात येथे कोरोनाचे आणखी 1153 रुग्ण आढळून आल्याने आकडा 61,438 वर पोहचला आहे.

मुंबईत कोरोनाचे आणखी 1100 रुग्ण आढळले असून 53 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे शहारातील COVID19 चा आकडा 1,14,287 वर पोहचला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 10,320 रुग्ण आढळून आल्याने आकडा 4,22,118 वर पोहचला आहे.

Load More

कोरोना व्हायरस (Coranavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार की नाही, याबाबतचा संभ्रम आज (31 जुलै) दुर होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यात याव्यात असे विद्यापीठ अनुदान आयोग सांगतो. आयोगाच्या सूचनेला आव्हान देत युवा सेना आणि इतर काही संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होत आहे. आजच्या सूनावणीत काही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याबाबत देशभरातील राज्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत घातक असल्याचे म्हटले आहे. परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय हा आम्ही धोरणात्कमपणे घेतला असल्याचेही यूजीसीचे म्हणने आहे. दुसऱ्या बाजूला परीक्षाच झाल्या नसतील तर इंटर्नशिप सुरु करण्यास भारतीय वैद्यकीय परिषदेने नकार दर्शवला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या पेचावर आणि याचिकेद्वारे दाखल झालेल्या दोन्ही प्रकरणांवर आज सुनावणी केली जाणार आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस संसर्गाचे निदान करण्यासाठी देशभरात कोविड 19 चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. मागिल 24 तासात 10 लाखांहून अधिक टेस्ट करण्यात आल्या आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रातूनही एक दिलासादायक वृत्त आहे. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांच्या वाढीचा वेग मंदावला आहे. राज्यात देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णांचा आकडा अधिक आहे. मात्र, असे असले तरी उपचार घेऊन घरी परतणाऱ्यांची संख्या वाढते आहे. तर नव्याने सापडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण घटते आहे. प्रामुख्याने मुंबई शहरात कोरनाव व्हायरस संक्रमितांची संख्या घटत असल्याचे चित्र आहे.

कोरोना व्हायरस, लॉकडाऊन, अनलॉक, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, संस्कृती, कृषी यांसह जगभरातील विविध घटना घडामोडी यांचा अद्ययावत तपशील ठळक मुद्द्यांसह जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.