
देशातील सर्वात वादग्रस्त प्रकरण म्हणजे बाबरी मशीद विध्वंस. २७ वर्ष हा वाद चालल्यानंतर अखेर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हिंदु पक्षाच्या बाजूने म्हणजे रामलल्लाच्या मंदिराच्या बाजूने निर्णय दिला. परंतु मशीद पाडणे हा गुन्हा आहे त्यामुळे मुस्लिम पक्षास नवीन मशिदीसाठी हिंदु पक्षाने अयोध्येतचं जमीन इतरत्र उपलब्ध निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. आज अयोध्येतील बाबरी मशिद पाडून ३० वर्ष पुर्ण झाले. तरी सध्या अयोध्येत रामलल्लाच्या मंदिराचं बांधकाम धुमधडाक्यात सुरु आहे. वर्षानुवर्षे चाल्लेल्या न्यायालयीन खटल्यानंतर आजही बाबरीच्या विध्वसंचे पडसात देशात उमटताना दिसतात. बाबबरी मशिद ही सोळाव्या दशकात बांधल्या गेल्याचा मुस्लीम पक्षाचा दावा आहे. पण हिंदु पक्ष मा कायमचं ती भगवान श्रीरामाची जन्मभुमी सल्याचं ठासुन सांगत होते. वर्षानुवर्ष चालत आलेला हा वाद शिगेला पेटला आणि ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी पाडण्यात आली.
पुढील दोन वर्षात म्हणजे २०२४ पर्यत रामलल्लाच्या मंदीराचे बांधकाम पुर्ण होणार असल्याची माहिती हिंदु पक्षाकडून देण्यात आली आहे. तरी भगवान श्रीरामाचं बांधण्यात येत असलेलं हे मंदिर भारतातील आकर्षक ठिकाणांपैकी एक असेल. संबंधीत बांधकामावर खुद्द उत्तर प्रदेश सरकार देखील विशेष लक्ष ठेवून आहेत. तसेच उत्तर प्रदेश सरकार अयोध्येत नवीन टाऊनशिप, रस्ता रुंदीकरण औद्योगिक क्षेत्र आणि विमानतळाचे काम अगदी झपाट्याने करत आहेत. (हे ही वाचा:- Rahul Gandhi Video: भारत जोडो यात्रेत 'मोदी-मोदी'चे नारे, Flying Kiss देत राहुल गांधींनी दिलं उत्तर)
अयोध्या सुरु असलेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिराबाबत असे रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादातील मुस्लीम याचिकाकर्त्यांपैकी एक इक्बाल अन्सारी म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने(9 नोव्हेंबर 2019 रोजी एकमताने अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा केल्यावर बाबरी मशिदीचा वाद संपला. आता त्यावर पुन्हा पुन्हा वक्तव्य करण्यापेक्षा रामल्लाच्या नव्याने होणाऱ्या मंदिरामुळे अयोध्या कशी समृध्द होईल यांवर लक्ष केंद्रीत करण महत्वाचं आहे.