आज आपण 21 व्या शतकात जगत आहोत, भारत (India) दिवसेनदिवस विज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती करत आहे तरीही काही गोष्टी अशा घडतात की ऐकून अंगावर काटा येतो. गुन्हेगारीच्या अनेक घटना हल्ली आपण ऐकतो पण या हे हत्याकांड माणूसकीला काळीमा फासणार आहे. अंधश्रध्देच्या आरोपातून तिन महिलांची निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना झारखंडमध्ये (Jharkhand) घडली आहे. हत्याकांड घडलेलं हे गाव रांची (Ranchi) पासून अगदी काही किलोमिटर लांब आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या हत्याकांडा नंतर या गावातील सगळे पुरुष फरार आहेत तरी झारखंड पोलिस (Jharkhand Police) या प्रकरणाचा सविस्तर तपास करीत आहेत. सोनहाटू पोलीस स्टेशन (Sonhatu Police Station) हद्दीतील रानाडीह गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तिहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
प्रकरणी दोन महिलांचे मृतदेह (Dead Bodies) ताब्यात घेतले असून तिसऱ्या मृतदेहाची शोधमोहीम सुरू आहे. ही हत्या कोणी केली याबाबतची सखोल चौकशी सध्या पोलिस (Police) करत आहेत. तसेच या घटनेप्रकरणी संपूर्ण गावकऱ्यांनी चौकशी केल्या जात आहे.भुत-प्रेतच्या नावाखाली अंधश्रध्देच्या (Superstition) प्रकारातून हे तिहेरी हत्याकांड घडल्याचं तपासातून स्पष्ट होत आहे. तरी एकाचवेळी गावातील सर्व पुरुष फरार होणं ही या प्रकरणातील सर्वात लक्षणीय बाब आहे.(हे ही वाचा:- Maharashtra ATS: पश्चिम बंगाल एसटीएफकडून महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने एका जिहादीस अटक)
हत्या करण्यात आलेल्या या तिन्ही महिलेचे कुटुंब रोजमजूरीच्या कामावरुन स्वतचा उदर्निवाह करत होते. तिन पैकी दोन मृतदेह सापडलेल्या या महिलांच्या अंगावर गंभीर जखमा दिसून येत आहे. तरी या महिलांची हत्या दगडफेक करुन झाल्याची शंका वर्तवण्यात येत आहे. तिसऱ्या मृतदेहाचा शोध झारखंड पोलिस (Jharkhand Police) घेत असली तरी हा सगळा प्रकार अत्यंत संतापजनक आहे.