आंतरराष्ट्रीय विमाने बंद असल्यामुळे परत जावू न शकलेल्या नागरिकांच्या 2020-21 साठी रहिवासी स्थितीचे नियम शिथील करण्याची CBDT ला विनंतीपत्र; 3 मार्चच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Poonam Poyrekar
|
Mar 04, 2021 12:07 AM IST
महाराष्ट्रात आजची पहाट ही आगीच्या घटनांनी सुरु झाली आहे. ठाण्यातील दायघर भागातील (Daighar Area) एका ऑटो गॅरेजला (Auto Garage) आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे. त्याचबरोबर या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कुणालाही दुखापत झाली नसल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र या आगीत बरीच वित्तहानी झाली आहे. या आगीत 15 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजले नाही.
दरम्यान औरंगाबाद वाळूंज एम आय डी सी भागाती कामगार चौकातील ध्रुव तारा कंपनीला देखील आज पहाटेच्या सुमारास आग लागली. ही आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
आज महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. काल विरोधकांनी सरकारवर टिका केल्यानंतर आजच्या अधिवेशनात अजून आरोप-प्रत्यारोप होतात. तसेच सरकार काय स्पष्टीकरण देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.