Assam: नागाव येथे पोलिसांनी 2 चोरांना पकडले; लाखांची रोकड, एक लॅपटॉप आणि सोन्याचे दागिने जप्त ; 29 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
                            
                                
                                    
                                        बातम्या
                                    
                                    
                                        Poonam Poyrekar
                                        |
                                    
                                    Oct 29, 2020 11:46 PM IST
                                 
                                
                             
                         
                
                                                गेल्या 7 महिन्यांपासून देशात हाहाकार माजविणा-या कोरोना व्हायरसची (Coronavirus) परिस्थिती मागील महिन्याभरापासून आटोक्यात आली आहे. कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढीचे प्रमाण कमी झाले असून बरे होणा-या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ही संपूर्ण देशवासियांसाठी दिलासादायक बातमी असून महाराष्ट्रातही (Maharashtra) कोरोना व्हायरस ब-यापैकी आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आहे. हे सर्व प्रशासनाच्या आणि जनतेच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे. मात्र येत्या डिसेंबरमध्ये देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता पुणे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांनी व्यक्त केली आहे. मी अपेक्षा करतो अशी परिस्थिती उद्भवू नये आणि तसे झाल्यास आम्ही तयार आहोत अशी माहिती महापौरांनी दिली आहे.
दरम्यान महाराष्ट्रात काल (28 ऑक्टोबर) 6,738 कोरोना बाधितांची भर पडली असून 91 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या 16,60,766 वर पोहचली आहे. त्यापैकी 14,86,926 जणांनी प्रकृती सुधारली असून 1,29,746 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 43,554 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 
तर मुंबईत 1354 नव्या रुग्णांसह जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,54,242 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 10,153 इतका झाला आहे.