महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी कोरोना विषाणूची लागण; 29 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Dec 29, 2020 11:50 PM IST
नववर्षाच्या स्वागतासाठी आता काही तासच उरले आहेत. त्यामुळे अवघे जग नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे. परंतू यंदाचे वर्ष हे नेहमीप्रमाणे नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याचे नाही. अवघ्या जगावर कोरोना व्हायरस संसर्गाचे सावट आहे. प्रत्येक वेळी कोरोनाचा नवनवाच स्टेन्स निर्माण होत आहे. त्यामुळे संशोधकांसोमर लस निर्मिती करताना आणि डॉक्टरांसमोर उपचार करताना मोठी समस्या निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा नववर्ष जल्लोष घरातूनच साजरा करावा लागणार आहे. राज्य सरकारनेही तसेच अवाहन केले आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने अवाहन करताना म्हटले आहे की, यंदा नववर्ष घरातूनच साजरे करा. फटाक्यांची आतषबाजी, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आदींच्या आयोजनावर बंदी आहे. त्यामुळे असे कार्यक्रम जाहीरपणे, सर्वजनिक ठिकाणी करणे टाळा. असे कार्यक्रम आपापल्या घरांतूनच साजरे करा.
एका बाजूला नववर्षाचे स्वागत कोरोनासोबतच्या संघर्षाने होत आहे. दुसऱ्या बाजूला देशभरातील शेतकऱ्यांचे नववर्ष हे केंद्र सरकारसोबतच्या संघर्षाने सुरु होते की काय असे चिन्ह आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात अद्यापही समाधानकारक चर्चा होऊन तोडगा निघाला नाही. त्यामुंळे केद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर सुरु केलेले आंदोलन अद्यापही कायम आहे. दरम्यान, केंद्र सरकारने आता पुन्हा एकदा शेतकरी संघटनेच्या प्रस्तावाला प्रतिसाद देत केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बुधवारी दुपारी 2 वाजताची वेळ दिली आहे. ठरलेल्या वेळेनुसार केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात काय चर्चा होते याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस धाडली आहे. या नोटीशीवरुन राजकीय वातावरण जोरदार तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. संजय राऊत यांनी नोटीस प्रकरणात काल पत्रकार परिषद घेऊन सरकार आणि ईडीवर जोरदार निशाणा साधला आहे. तर 'कर नाही तर डर कशाला' असे म्हणत भाजप नेत्यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. हा संघर्ष इतक्यात थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे आगामी काळात आणखी काय काय पाहायला मिळते हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान, राजकारण, अर्थकारण, सामाजकारण, संस्कृती, कृषी आरोग्य, संशोधन, उद्योग यांसह जगभरातील घटना, घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग पाहात राहा. लेटेस्टली सोबत जोडलेले राहा.