Close
Advertisement
 
शनिवार, नोव्हेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
36 minutes ago

झारखंड येथे आज आणखी 209 कोरोनाबाधितांची नोंद; एकाचा मृत्यू; 28 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Poonam Poyrekar | Nov 28, 2020 11:29 PM IST
A+
A-
28 Nov, 23:29 (IST)

झारखंड येथे आज आणखी 209 कोरोनाबाधितांची नोंद झाली आली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण 1 लाख 8 हजार 786 वर पोहचली आहे. तर, आतापर्यंत 963 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्विट-

 

28 Nov, 23:23 (IST)

मिसिंग MiG-29K पायलट कमांडर निशांत सिंग याच्याबाबतची शोध मोहीम अजूनही सुरु आहे. यासाठी युद्धनौका आणि विमानांचा वापर सुरू आहे. गुरुवारी (26 नोव्हेंबर) रोजी MiG-29K सह पायलटने उड्डाण केल्यानंतर ते अरबी समुद्रावरून जात असताना क्रॅश झाले होते. ट्विट-

 

28 Nov, 22:49 (IST)

2017 मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांच्या हातून निसटलेले  गोरखा जनमुक्ती मोर्चाचे नेते रोशन गिरी तीन वर्षांनंतर दार्जिलिंगला परतले आहेत.

 

28 Nov, 22:18 (IST)

आंध्र प्रदेशातील चित्तूर, कडप्पा जिल्ह्यात मागील 3 दिवसात मुसळधार ते अति मुसळधार पावसामुळे झालेल्या पूरात आठ जण ठार झाले आहेत. राज्य सरकारने ही माहिती दिली.

28 Nov, 21:51 (IST)

Andhra Pradesh: विशाखापट्टणम येथे चिंतापल्ली एएसपी विद्या सागर नायडू यांच्यासमोर आज  5 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

28 Nov, 21:11 (IST)

मुंबईत आज कोरोना विषाणूच्या 1,063 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आज 880 रुग्ण बरे झाले असून, 17 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण संक्रमितांची संख्या 2,81,874 वर पोहोचली आहे. यामध्ये आतापर्यंत 2,55,345 रुग्ण बरे झाले असून, 10,773 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात 12,753 सक्रीय रुग्ण आहेत.

28 Nov, 20:46 (IST)

मणिपूर येथे कोरोनाचे आणखी 235 रुग्ण आढळले असून 197 जणांची प्रकृती सुधारली आहे.

28 Nov, 20:31 (IST)

दिल्लीत गार्डनमध्ये असलेल्या बाकावरील पाय काढत नसल्याने 23 वर्षीय व्यक्तीकडून मुलाची  गोळी घालून हत्या करण्यात आली आहे.

28 Nov, 20:21 (IST)

NSA अजित डोवाल यांनी श्रीलंका राष्ट्रपती गोताबाया राजपक्ष यांची भेट घेतली आहे.

28 Nov, 20:03 (IST)

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 5965 रुग्ण आढळले असून 75 जणांचा बळी गेला आहे.

Load More

राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके (Bharat Bhalke Passed Away) यांचे काल मध्यरात्री निधन झाले. पुण्यातील रूबी रुग्णालयात (Pune Ruby Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 60 वर्षांचे होते. गेल्या काहीच दिवसांपूर्वी कोरोनावर मात करून घरी परतले होते. मात्र, पुन्हा एकदा अस्वस्थ जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणयात आले होते. तिथे त्यांना पोस्ट कोव्हिड झाल्याचे निदान झाले. भालके यांना मधुमेह व रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात होती. त्यात त्यांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांच्या कुटूंबियांसह संपूर्ण पंढरपूरात शोककळा पसरली आहे. आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अहमदाबाद (Ahmedabad), हैदराबाद (Hyderabad) आणि पुणे (Pune) येथे भेट देऊन कोविड लसीच्या विकासाचा आढावा घेणार आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे मोदी येणार असल्याने विशेष तयारी करण्यात आली आहे. तसेच पुणे परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान महाराष्ट्रात कोरोना बाधितांची एकूण संख्या 18 लाख 08 हजार 550 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 46,898 वर पोहोचली आहे. राज्यात सद्य घडीला 87,969 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


Show Full Article Share Now