वर्धा: शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून रस्ता बांधकाम कंपनीच्या कार्यलयाची तोडफोड; 2 कामगारांचा मृत्यू तर, 1 जण जखमी; 28 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Dipali Nevarekar
|
Feb 28, 2020 11:19 PM IST
मुंबई सह महाराष्ट्रामध्ये वातावरणामध्ये होत असलेल्या विचित्र बदलांमुळे राज्यातील समान्यांना उष्णतेचा त्रास होत आहे. दरम्यान यंदा फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेचा पारा दोन वेळेस 38 अंशाच्या पार गेला आहे. मुंबईमध्ये गुरूवार (27 फेब्रुवारी) दिवशी उष्णतेचा पारा मागील 10 वर्षांतील सर्वाधिक तापमानाचा ठरला आहे. सध्या वातावरणामध्ये आर्द्रता कमी होत असल्याने उष्णता वाढत आहे. मुंबई सोबतच कोकणामध्येही वातावरणामध्ये उष्णता कायम आहे. दरम्यान मुंबई हवामान वेधशाळेने आजपासून वातावरातील उष्णता कमी होऊ शकते असा दिलासा वर्तवला आहे. पूर्वेकडून वाहणारे वारे, कमी आर्द्रता आणि समुद्र किनार्यावरून वारे उशिरा येत असल्याने वातावरणामध्ये बदल झाला असल्याची माहिती हवामन वेधशाळेने दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये आज शेतकरी कर्जमाफी दुसरी यादी जाहीर केली जाणार आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे सप्टेंबर 2019पर्यंत थकित आहे, ते कर्ज माफ करण्यात येईल. या योजनेला महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असे नाव देण्यात आले आहे. मार्च 2020 पासून ही योजना लागू होईल', अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती त्यानुसार पहिल्या यादीमध्ये पहिल्या यादीत सुमारे 15 हजार 358 लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश होता.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
महाराष्ट्रामध्ये सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज त्याचा पाचवा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्च दिवशी विधिमंडळात जाहीर केला जाणार आहे.