अण्णा हजारे यांनी फटकारले 'भाजपने केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन करावे'; 28 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Chanda Mandavkar
|
Aug 28, 2020 11:58 PM IST
देशभरात कोरोना व्हायरसचे संकट असताना युसीजीकडून परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही याचा निर्णय आज होणार आहे. या संदर्भातील दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट निकाल देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. युसीजीच्या 6 जुलैच्या मार्गदर्शक सुचनांनुसार परीक्षा 30 सप्टेंबर घ्याव्यात असे सांगण्यात आले होते. परंतु या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टात विद्यार्थ्यांच्या विविध गटाकडून याचिका दाखल करण्यात आल्या. तसेच महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा परीक्षासंदर्भात युवासेनेच्या वतीने याचिका दाखल केली होती. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षेला आता राजकीय दृष्टीकोनातून सुद्धा पाहिले जात आहे.
दुसऱ्या बाजूला कोरोना व्हायरस बद्दल बोलायचे झाल्यास देशासह महाराष्ट्रात त्याच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. राज्यात काल कोरोनाचे आणखी 14,718 रुग्ण आढळून आले असून 355 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील कोविड19 चा आकडा 7,33,568 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात सध्या 5,31,563 रुग्णांची प्रकृती सुधारली असून एकूण 23,444 वर पोहचला आहे. त्याचसोबत 1,78,234 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. तर राज्यात लॉकडाऊन हळूहळू उठवला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तसेच यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने मोठी धुम पहायला मिळत नाही आहे. परंतु काल राज्यातील विविध ठिकाणी सात दिवसांच्या गणपतींसह गौरींचे सुद्धा विसर्जन करण्यात आले. त्याचसोबत नागरिक या वर्षातील गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करताना दिसून येत आहेत. बहुतांश नागरिकांनी बाप्पाचे विसर्जन महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलाव किंवा घरच्या घरीच केले आहे.