आदरणीय शरद पवार साहेबांचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील 'राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा ' उद्यापासून (दि.२८ जानेवारी) सुरु करीत आहेत, असे ट्विट राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. ट्विट-

 

हरियाणाच्या पलवल जिल्ह्यात ट्रॅक्टर परेड दरम्यान जबरदस्तीने दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या जवळजवळ 2 हजार अज्ञात आंदोलकांवर, धोकादायकपणे ड्रायव्हिंगसह इतर कारणांमुळे गुन्हा दाखल झाला आहे.

काल दिल्लीत जे काही घडले त्यास आम्ही पाठिंबा देत नाही. सरकार संवेदनशील असते तर 26 जानेवारी रोजी दिल्लीतील हिंसाचार घडला नसता. यामुळे काही लोक फायदा घेत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे मत व्यक्त केले आहे.

काल झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी संघटनांनी आंदोलन संपवणे ही चांगली गोष्ट नाही. काल झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनाला मोठा धक्का बसला आहे. आम्ही आत्मचिंतन करू. आता आपण लोकांना पुन्हा एकत्रित केले पाहिजे. काल झालेल्या घटनेची आम्ही नैतिक जबाबदारी घेतली आहे. शेतकरी नेते दर्शन पाल सिंह यांनी हे मत व्यक्त केले आहे.

मुंबई: ईडीने ओंकार रीएल्टर्स आणि डेव्हलपर्स प्रा.लि.चे अध्यक्ष कमल किशोर गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना अटक केली. 22,000 कोटींच्या कथित एसआरए विकास घोटाळा आणि येस बँक एक्सपोजर प्रकरणात त्यांना अटक झाली आहे.

200 कोटी रुपयांहून अधिकच्या मनी लाँडरिंग प्रकरणात अटक झाल्यानंतर मुंबई कोर्टाने येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांना 30 जानेवारी पर्यंत ईडी कोठडीत पाठवले.

कोरोनाची लस घेतल्यानंतर ओडिसा येथील व्यक्तीचा मृत्यू झाला असून शवविच्छदेन रिपोर्टसची प्रतीक्षा केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी 19 आरोपींना अटक तर 50 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दिल्लीत ट्रॅक्टर रॅली वेळी झालेल्या हिंसाचाराबद्दल पोलिसांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.

आर्थिक सर्वेक्षण 2020-21 येत्या 29 जानेवारीला संसदेत सादर केला जाणार  आहे.

Load More

कृषी कायद्याविरुद्ध मागील 2 महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनाला काल हिंसक वळण लागले. शेतकरी ट्रॅक्टर रॅली दरम्यान पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये हिंसक चकमक झाली. यात बसेसची तोडफोड झाली तर काही पोलिस जखमी झाले. याप्रकरणी 15 एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. तर पूर्व रेंजमध्ये 5 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत, अशी माहिती दिल्ली पोलिसा सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान, लाल किल्ला मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. तर जामा मशिद मेट्रो स्टेशनही बंद करण्यात आले आहे, अशी माहिती दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिली आहे. दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

राज्यात मार्च महिन्यापासून बंद असलेल्या शाळा आज पुन्हा सुरु होणार आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मागील 10 महिने विद्यार्थ्यांनी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण घेतले. त्यानंतर इयत्ता 9 वी ते 12 वी चे वर्ग सुरु केल्यानंतर आता इयत्ता 5 वी ते 8 वी चे वर्ग सुरु आजपासून सुरु करण्यात येणार आहेत.