Lockdown: कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने नाशिक येथील शेतकरी संकटात; 26 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Siddhi Shinde
|
May 26, 2020 11:47 PM IST
देशांतर्गत सुरु झालेल्या विमानसेवांचा आजचा दुसरा दिवस आहे. यासाठी मुंबई (Mumbai) आणि दिल्ली (Delhi) विमानतळावरून दिवसाच्या सुरुवातीलाच आज आणि उद्याच्या दिवसभरातील विमानफेऱ्यांची सविस्तर वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. काल या सेवा पुन्हा सूरु होण्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई विमानतळावरून दिल्लीसाठी सुटणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाची फेरी रद्द झाली होती, ज्यामुळे प्रवाशांची एन वेळेस पंचाईत झाली होती, मात्र असे पुन्हा घडू नये यासाठी अगोदरच वेळापत्रकाविषयी प्रवाशांना कळवण्यात आले आहे.
दुसरीकडे मागील काही दिवसांपासून जम्मू काश्मीर येथे सुरु असणाऱ्या सततच्या दहशतवादी कारवाया सुरु आहेत. आज तर पाकिस्तानी लष्कराकडून सुद्धा काश्मीर येथील पुंछ जिल्ह्याजवळील LOC चे उल्लंघन करून गोळीबार करण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी भारतीय व पाकिस्तानी सैन्यात चकमक सुरु आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, देशातील कोरोना व्हायरसच्या अपडेट्सकडे पाहायला गेल्यास, सद्य घडीला देशातील कोरोनाबाधितांचा आकडा हा दीड लाखाचा टप्पा गाठण्याच्या जवळ आहे. आजवर कोरोनामुळे 4000 हुन अधिक मृत्यू झाले आहेत तर 57 हजाराहून अधिकांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र जिल्ह्यात आढळले असून त्यांचीच संख्या 52 हजाराच्या वर आहे. जगभरात आतापर्यंत 5.3 मिलियन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे तर 3 लाख 42 हजार जणांचा या जीव घ्या विषाणूने बळी गेला आहे.