सचिन अहिर यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ; 26 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Siddhi Shinde
|
Jul 26, 2020 11:57 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज 26 जुलै रोजी मन की बात (Maan Ki Baat) या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत.कोरोनाचे (Coronavirus) संकट देशावर घोंगावत असताना दिवसरात्र राबून काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आजच्या कार्यक्रमातून मोदी भाष्य करतील असे अंदाज आहेत. तसेच आज देशासाठी अत्यंत खास दिवस म्हणजेच भारत पाकिस्तान 1999 कारगिल युद्धातील आपल्या देशाचा विजयी दिवस सुद्धा आहे. याच कारगिल विजय दिवसाबाबत (Kargil Vijay Diwas) सुद्धा मोदी विशेष भाष्य करतील.
दुसरीकडे कोरोनाच्या स्थितीकडे पाहायला गेल्यास,मागील 24 तासात देशात विक्रमी अशा 4,42,031 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यापैकी सरकारी टेस्टिंग लॅब मध्ये पहिल्यांदाच 3,62,153 इतक्या मोठ्या संख्येत चाचण्या पार पडल्या तर खाजगी लॅब्स मध्ये सुद्धा कालच्या दिवसात 79,878 इतक्या चाचण्या झाल्याचे समजतेय. सध्या भारतात 13 लाखाहून अधिक कोरोना रुग्ण असून यापैकी 8 लाखहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, देशात काही भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी आसाम मध्ये निर्माण झालेली पूरस्थिती आटोक्यात येते ना येत तोपर्यंत आता बिहार मध्ये सुद्धा काही दिवसांपासून पूर आला आहे. मुझ्झाफरनगर सारख्या भागात अनेक भागात पाणी साचले असून आता NDRF च्या तुकड्या लोकांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहेत.