Thiruvananthapuram: 51 वर्षीय पत्नीच्या मृत्यू प्रकरणी 28 वर्षीय व्यक्तीला अटक; 26 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Dec 26, 2020 11:53 PM IST
सध्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा आह ऑस्ट्रेलिया विरूद्ध दुसरा कसोटी सामाना सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळवत भारतीयांना नमवलं होतं. त्यामुळे आता त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी संघ पूर्ण जोमाने मैदानात उतरला आहे.
दरम्यान देशात मागील महिन्याभरापासून शेतकरी नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. आता त्यांच्या मागणीला पाठिंबा देत समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये अण्णा हजारेंनी दिल्लीमध्ये रामलीला मैदान अथवा जंतरमंतर वर परवानगी न मिळाल्यास अटक करून घेत तुरूंगातच उपोषण सुरू करू असे स्पष्ट केले आहे. उपोषणासाठी जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात रामलीला मैदानाची मागणी नवी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
ब्रिटनमध्ये नव्या कोरोनामुळे पुन्हा जगभर दहशत पसरल्याने आता भारतामध्येही अधिक दक्षता घेतली जात आहे. यामध्ये मागील महिन्याभरात परतलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्या कोरोना चाचणी करून माहिती घेत जात आहे. त्यांच्यासोबतच संपर्कात आलेल्या अनेकांची विचारपुस केली जात आहे.