झारखंड येथे 214 कोरोनाबाधित रुग्णांची भर; 25 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Jul 25, 2020 11:55 PM IST
कोरोना व्हायरस संकटाचा वेढा कायम असला तरी, लॉकडाऊच्या कचाट्यातून महाराष्ट्र हळूहळू बाहेर पडू पाहतोय. महाराष्ट्र सरकारही लॉकडाऊन नियमांमध्ये काहीशी शिथिलता देऊन राज्याचे अर्थचक्र सुरु करु पाहतेय. त्याचे फायदे तोटे नजीकच्या काळात पाहायला मिळतीलच. तूर्तास तरी, येत्या 1 ऑगस्टपासून राज्यातील मॉल्स आणि व्यापारी संकुले सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. राज्यातील जनता आणि उद्योग, व्यावसायिकांसाठी हा एक मोठा दिलासाच म्हणायचा.
दरम्यान, एकूण चित्र पाहता आता राज्यातील टाळेबंदी लवकर हटवूया अशाच विचारांप्रत राज्य सरकार आल्याचे दिसते. प्रसारमाध्यमांतूनही तशाच आशयाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. असे असले तरी उद्योग, व्यवसाय आणि सार्वजनिक सेवांचे ठिक आहे. परंतू, शाळा, महाविद्यालयांचे काय? हा प्रश्न आहेच. मात्र, केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे पाहून महाराष्ट्र सरकार हा निर्णय घेईल असे दिसते. म्हणजे केंद्राच्या निर्णयापर्यंत तूर्तास तरी वाट पाहावी लागणार आहे.
दरम्यान, राज्यातील मॉल्स आणि संकुले सुरु करण्यास परवानगी मिळाली असली तरी मोठी हॉटेल्स आणि उपहारगृहांचे काय? याबाबतही उत्सुकता आहे. नाही म्हणायला निवासी व्यवस्था असलेली विश्रामगृह, हॉटेल्स (लॉजिंग आणि बोर्डिंग) सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. परंतू, हॉटेल्स खुली केल्यास होणारी संभाव्य गर्दी विचारात घेता हा निर्णय कसा घेतला जातो याबाबत उस्तुकता आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरस, लॉकडाऊन यांसोबतच स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटना, घडामोडी, त्याचे अद्ययावत तपशील आणि ठळक मुद्दे जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.