हरियाणामध्ये आज 166 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

 

मुकेश अंबानी यांच्या घराशेजारी संशयास्पद वाहनाच्या आत पत्र सापडले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तपासणीसाठी वाहन ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

हिमाचल प्रदेश: शिमलाच्या नानखारी भागात पाच घरांना आग लागली आहे.

जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.   

जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.   

झारखंडमध्ये गेल्या 24 तासात 76 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशमध्ये आज 368 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 201 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

  

केंद्र, राज्यांनी इंधनाचे दर कमी करण्याबाबत बोलले पाहिजे, असं अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे.

 

तमिळनाडू मधील 9,10 आणि 11 वी च्या विद्यार्थ्यांना पुढील शैणिक वर्ष 2020-21 साठी पास करण्यात येणार आहे.

विनाअनुदानित व्यावसायिक संस्थांना शुल्काबाबत निर्णय घेण्याची स्वायत्तता आहे. परंतु याचा परिणाम नफा मिळवणे किंवा Capitation फी नसावा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

 

Load More

मुंबईसह राज्यात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने अनेक कडक निर्बंध लादले आहेत. लग्नसोहळ्यासाठी केवळ 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई नंतर ठाण्यातही लागू करण्यात आला असून लग्नसोहळ्याचा व्हिडिओ पोलिसांना पाठवणे बंधनकारक असणार आहे.

कोविड-19 वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना लसीकरण जलद गतीने करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 1 मार्चपासून 60 वर्षांपेक्षा अधिक आणि 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस दिली जाणार आहे. यासाठी 10,000 सरकारी आणि 20,000 खाजगी लसीकरण केंद्र सज्ज असतील. दरम्यान, सरकारी केंद्रावर मोफत लस देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

1 मार्च, सोमवार पासून अर्थसंकल्प अधिवेशनला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यासाठी आज कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. यापूर्वीच्या बैठकीत 1 ते 8 मार्च पर्यंतचे कामकाज ठरवण्यात आलं होतं. दरम्यान, 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.