Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 29, 2025
ताज्या बातम्या
3 hours ago

लातूर जिल्ह्यात लग्नाच्या जेवणातून 200 पेक्षा जास्त लोकांना विषबाधा ; 24 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Darshana Pawar | Jan 24, 2021 11:37 PM IST
A+
A-
24 Jan, 23:37 (IST)

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील व्यापारी पेठ असलेल्या वाढवणा येथे झालेल्या लग्नात 200 हून अधिक लोकांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ABP माझा ने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

24 Jan, 22:53 (IST)

बॉलिवूडची बहुचर्चित जोडी Varun Dhawan-Natasha Dalal यांचे नुकतेच लग्न झाले असून लग्नानंतर ते मिडियासमोर आले. See Pics

24 Jan, 22:23 (IST)

मुंबईतील आझाद मैदानात आज जवळपास 15,000 शेतकरी दाखल झाले आहेत आणि उद्या आणखी येणार आहेत अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे नेते ए नवले यांनी दिली आहे.

24 Jan, 22:13 (IST)

झारखंडमध्ये आज दिवसभरात 109 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 1,16,402 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

24 Jan, 22:05 (IST)

हिमाचल प्रदेश मध्ये आज कोरोनाचे नवे 21 रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 57,210 वर पोहोचली आहे.

24 Jan, 21:22 (IST)

मुंबईत आज आणखी 429 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 7 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्विट- 

 

24 Jan, 20:44 (IST)

गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि फरिदाबाद येथे हवेची गुणवत्ता खालवली  गेली आहे.

24 Jan, 20:27 (IST)

तेलंगणा मधील  19 जानेवारीला हेल्थवर्कर महिलेला लस दिल्यानंतर आज तिचा मृत्यू झाला आहे.

24 Jan, 20:13 (IST)

देशातील जवळजवळ 16 लाख हेल्थ वर्कर्सला कोरोना लसीच्या मोहिअंतर्गत लस दिली गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

24 Jan, 19:56 (IST)

Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar देशातील 32 मुलांना दिला जाणार आहे.

Load More

देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर्स, 50 वर्षांवरील व्यक्ती आणि 50 वर्षांखालील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे भारत इतर देशांनाही लसीचा पुरवठा करत आहे. कोविड-19 संकटात भारताने केलेल्या सहकार्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख Tedros Adhanom Ghebreyesus कौतुक केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

देशात थंडीची लाट पसरली असून अनेक ठिकाणी धुक्याची दाट चादर पाहायला मिळत आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीत पुढील काही आठवड्यात पारा 4 अंशावर जाईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातही थंडीचे प्रमाण वाढले असून पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतही सकाळच्या वेळेस गारवा जाणवत आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

गेल्या काही दिवसांपासून एनसीबीकडून धाडसत्र सुरु आहे. ड्रग पेडलर चिंकू पठाण याला अटक केल्यानंतर आता जुहू मधील काही ठिकाणी एनसीबी छापे टाकणार आहे. दरम्यान, मुंबईमधील ड्रग रॅकेट उघडकीस आल्यानंतर अनेकजण एनसीबीच्या रडारावर आहेत. यापूर्वी अनेक बॉलिवूड कलाकारांची कसून चौकशी करण्यात आली आहे.


Show Full Article Share Now