बलिया: पत्रकार रतन सिंह याची गोळ्या झाडून हत्या ; 24 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Dipali Nevarekar
|
Aug 25, 2020 12:03 AM IST
महाराष्ट्रासह सध्या जगभरात कोरोना व्हायरसच्या सावटाखाली गणेशोत्सव साजरा केला जात आहे. काल दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप दिल्यानंतर आता ज्येष्ठा गौरी आवाहन आणि पुजनासाठी जंगी तयारी सुरू आहे. दरम्यान अनेक गणेशभक्त साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत आहेत.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या आणि मृत्यू प्रकरणी तपासासाठी सीबीआयचं पथक मुंबईमध्ये दाखल झाले आहे. मागील 2 दिवस सुशांतच्या घराची तपासणी केल्यानंतर आता आज त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान कॉंग्रेस पक्षामध्येही आता मोठ्या बदलांचे संकेत मिळत आहेत. पक्षात नेतृत्त्व बदल होऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांचा कार्यकाळ संपत असल्याने आता त्या राजीनामा देण्याची शक्यता आहे. तर कॉंग्रेसमधील एका गटाचा राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचं पुन्हा नेतृत्त्व देण्याची मागणी आहे. तर काहींनी सामूहिक नेतृत्वाची मागणी पत्राद्वारा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे.