GST नोंदणीच्या रजिस्ट्रेशन पूर्वी आता अर्जदाराची पडताळणी केली जाणार ; 23 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Dec 23, 2020 11:21 PM IST
काल पासून राज्यातील सर्व महापालिकेच्या हद्दीमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत सुरु राहणाऱ्या या संचारबंदीमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत बाहेर फिरण्यास सक्त मनाई आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध ठिकाणी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याचे गेल्या काही दिवसापासून दिसून येत आहे. सध्या 26 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात 10,000 पेक्षा कमी सक्रीय रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. ही संख्या कमी होत असल्याने आणि लसीच्या सकारात्मक विकासामुळे दिलासा मिळत असताना कोरोनाच्या नव्या प्रकाराचा धोका उद्भवला आहे. त्यामुळे Europe आणि Middle East मधून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
आज पहाटे दिल्लीच्या पालममध्ये 8.0℃ तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात तापमान 0.8 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. सफदरजंग येथे 5.6 टक्के तापमानाची नोंद झाली असून त्यात 1.6 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे.