पुणेकरांना लवकरात लवकर मेट्रोची सुविधा देऊन वाहतुकीवरचा ताण करणार- अजित पवार; 22 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Bhakti Aghav
|
Nov 22, 2020 11:28 PM IST
देशात कमी झालेल्या कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे. शनिवारी देशात 46 हजार 232 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या 90 लाख 50 हजार 597 इतकी झाली आहे. तसेच 564 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 32 हजार 726 वर पोहोचली आहे.
याशिवाय महाराष्ट्रातदेखील कोरोना रुग्णांच्या संख्येत शनिवारी मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. काल दिवसभरात राज्यात 5 हजार 760 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले. तसेच 62 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवाळीनंतर करोना रुग्णांची संख्या वाढणार असल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली होती. त्यानुसार, दिवाळी आणि हिवाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. नागरिकांनी योग्य खबरदारी न घेतल्यास देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, सोमवारपासून राज्यातील इयत्ता 9 वी ते 12 चे वर्ग सुरु होणार आहेत. त्यामुळे सध्या सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत 8 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यात 22 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शिक्षकांनाचं कोरोना विषाणूची लागण झाल्याने पालक आणि शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.