JEE, NEET Exam 2020- जेईई, नीट परीक्षा रद्द करा, दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांचे केंद्राला अवाहन; 22 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Siddhi Shinde
|
Aug 22, 2020 11:46 PM IST
आज, 22 ऑगस्ट रोजी देश विदेशात गणरायांंचे आगमन झाले आहे. यंंदा मुंंबईत गणेशोत्सवाच्या निमित्त सार्वजनिक स्तरावर केलंं जाणारंं आयोजन परंपरेपुरतं केलं जाईल. कोरोनाच्या संकटामुळे सणाचे स्वरुप साधे असले तरी सर्वत्र उत्साह मात्र कायम आहे. पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी सुद्धा काही वेळापुर्वी आपल्या ट्विटर अकाउंट वरुन समस्त देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दुसरीकडे, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपली 86 वर्षांची परंपरा मोडुन यंदा आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. या आरोग्यउत्सवाची 3 ऑगस्ट रोजी शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरुवात झाली होती. आज सकाळी या आरोग्यउत्सवात दीपप्रज्वलन करून रक्तदान शिबिराला सुरुवात झाली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कोरोना व्हायरस संंदर्भातील अपडेट पाहायला गेल्यास कालच्या दिवसभरात देशात 1 मिलियन म्हणजेच 10 लाख कोरोना चाचण्या पार पडल्या. आता पर्यंतची ही विक्रमी नोंंद आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 28,36,926 इतका आहे.