Close
Advertisement
 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024
ताज्या बातम्या
13 minutes ago

Epidemic Diseases (Amendment) Bil 2020: महामारी सुधारणा विधेयक संसदेत मंजूर; 21 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Siddhi Shinde | Sep 21, 2020 11:58 PM IST
A+
A-
21 Sep, 23:58 (IST)

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज महामारी सुधारणा विधेयक आज आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.

21 Sep, 23:42 (IST)

आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने विजयी सुरुवात केली. पहिलाच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा पराभव केला. बंगळुरु संघाने हा विजय 10 धावांनी मिळवला.

21 Sep, 23:28 (IST)

छत्तीसगड राज्यात विजापूर येथील एका नदीवरुन जाताना एक बस पूलावरुन पाण्यात कोसळली. नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करुन परतनारे सरकारी कर्मचारी या बसमधून प्रवास करत होते.

21 Sep, 22:58 (IST)

मुंबईतील इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरुन आज एका 8 फूट लांबीच्या अजगाराची सुटका करण्यात आली. अजगराची सुटका करताना काही काळ वाहतूक कोंडीही झाली. मात्र, अजगराला जीवदान मिळाले. एका कारमधून या अजगराची सुटका करण्यात आली.

21 Sep, 22:54 (IST)

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray यांना मुंबई-मांडवा रो-रो बोट (Raj Thackeray In Mumbai-Mandwa RoRo) प्रवासात बेकायदेशीररित्या धुम्रपाण (Raj Thackeray Smoking) केल्याबद्दल दंड आकारण्यात आल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. मात्र, हे वृत्त केवळ दिशाभूलच करणारे नव्हे तर पूर्णपणे चुकीचे असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हटले आहे.

21 Sep, 22:32 (IST)

शेती बिलास विरोध करणाऱ्या 8 खासदारांचे निलंबन म्हणजे हा लोकशाहीवरील हल्ला आहे, अशा शब्दात केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

21 Sep, 22:19 (IST)

झारखंडमध्ये आज 1,321 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

21 Sep, 22:12 (IST)

उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथे रात्री 9 वाजताच्या सुमारास 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का जाणवला.

21 Sep, 21:55 (IST)

पंजाबमध्ये आज 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 2,247 नव्या कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडली आहे. सध्या राज्यात 21,661 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

21 Sep, 21:45 (IST)

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे की, विविध पिकांच्या किमान आधारभूत किंमती वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकर्‍यांच्या सुधारणांच्या विधेयकाबाबत 'दिशाभूल' करणाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे. त्यांनी शेतकऱ्यांची 'माफी मागितली पाहिजे', असेही नड्डा म्हणाले.

Load More

आज पहाटे भिवंंडी (Bhiwandi Building Collapsed) मधील एक इमारत कोसळली आहे ज्यामध्ये 10 जणांंचा दुर्दैवी मृत्यु झाल्याचे समजतेय. याठिकाणी सध्या NDRF चं पथक मदत कार्य करत असुन आणखीन काही जण ढिगार्‍याखाली अडकले असल्याची शक्यता आहे.

(Monsoon Update) हवामान खात्याच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आज मुंंबई, ठाणे, कोकण, गोवा येथे जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्या सुद्धा पावसाचा जोर कायम राहणार आहे अशी माहिती आयएमडी कडुन देण्यात आली आहे.

दुसरीकडे, मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी स्थगिती दिल्याच्या कारणाने आज सोलापूर मध्ये जिल्हा बंद पुकारलेला आहे. यावेळी आमदार व खासदारांच्या घरासमोर जाउन निदर्शन केली जातील अशी माहिती मिळतेय तर काही वेळापुर्वी आंदोलकांनी पंढरपूर पुणे महामार्ग अडवुन धरला आहे. याठिकाणी एक मराठा लाख मराठा च्या जोरदार घोषणा देत दोन्ही बाजूची वाहतूक आंदोलकांनी अडवली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

कोरोना व्हायरस रिकव्हरी च्या बाबत एक चांंगली माहिती समोर येतेय. केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाच्या माहितीनुसार जगभरात कोरोनाच्या रिकव्हरीमध्ये भारत सध्या टॉप ला आहे, भारतात आजवर 43 लाखाहुन अधिक रिकव्हरी झाल्या असुन ही संख्या जागतिक रिकव्हर रुग्णांंच्या संख्येचा 19% भाग आहे.


Show Full Article Share Now