Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
2 minutes ago

BJP MLC सुनील कुमार सिंह यांचा एम्स पटना येथे कोरोना व्हायरसमुळे मृत्यू; 21 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या अण्णासाहेब चवरे | Jul 21, 2020 11:44 PM IST
A+
A-
21 Jul, 23:44 (IST)

बिहार येथील BJP MLC सुनील कुमार सिंह यांचा एम्स पटना येथे कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

21 Jul, 23:32 (IST)

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत आढळून आले होते. आता मुंबई पाठोपाठ ठाण्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. ठाण्यात आज 1 हजार 323 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 40 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्विट-

 

21 Jul, 22:46 (IST)

मुंबईच्या कूपर हॉस्पिटलमध्ये कोरोना विषाणू रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला होता व रुग्णालय आणि मनपा अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचे आरोप केले होते. त्यावर बीएमसीने उत्तर दिले आहे.  बीएमसीने सांगितले आहे, 'हॉस्पिटल मॅनेजमेंटने आयसीएमआर मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठरविलेल्या गोष्टी केल्या आणि रूग्णाला त्वरित भर्ती करून घेऊन आवश्यक उपचार देण्यात आले. त्यामुळे रुग्णालय निष्काळजी होते हे खरे नाही.

या मुलाच्या तोंडातून रक्तस्त्राव होत होता आणि त्याला तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले. या मुलामध्ये निमोनियाची लक्षणे दिसली होती. न्यूमोनिया आणि कोविडची लक्षणे समान आहेत. मृत्यूचे कारण निमोनिया आणि संशयित कोविड म्हणून नोंदवले गेले. आयसीएमआर प्रोटोकॉलनुसार त्याचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला परंतु कुटुंबीय संतप्त झाले, असे बीएमसीने सांगितले आहे.

 

21 Jul, 22:11 (IST)

शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. स्वतः सत्तार यांनी ट्वीट द्वारे ही माहिती दिली आहे. घाबरण्याची आवश्यक्ता नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

21 Jul, 22:02 (IST)

पुणे शहरात आज नव्याने 1,512 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद झाली आहे. यासह पुणे शहरातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 40,715 इतकी झाली आहे.

21 Jul, 21:53 (IST)

बिहारमधील पूर परिस्थिती लक्षात घेता राज्यात NDRF ची 19 पथके तैनात आहेत.  सत्य प्रधान, एनडीआरएफचे महासंचालक यांनी याबाबत माहिती दिली.

21 Jul, 21:22 (IST)

17 जुलै रोजी विशेष विमानाने मुंबई विमानतळामार्गे दुबईला पळ काढल्याबद्दल पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील 30 वर्षीय महिलेविरूद्ध FIR दाखल करण्यात आला आहे. या महिलेची कोरोना विषाणू चाचणी सकारात्मक आली होती.

21 Jul, 20:59 (IST)

दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी भारतात 1 ऑगस्ट, शनिवार रोजी बकरी ईद साजरी केली जाण्याची घोषणा केली. 

21 Jul, 20:50 (IST)

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी स्टेटमेंट नोंदवण्यासाठी आलेले चित्रपट समीक्षक राजीव मसंद वांद्रे पोलीस ठाण्यातून निघाले.

21 Jul, 20:23 (IST)

आज मुंबईत 995 नवीन कोविड-19 पॉझिटिव्ह, 905 रुग्णांना डिस्चार्ज आणि 62 मृत्यूची नोंद झाली आहे. एकूण प्रकरणांची संख्या वाढून 1,03,262 वर गेली आहे, ज्यात 23,893 सक्रिय प्रकरणांचा समावेश आहे, तर 73,555 बरे झाले आहेत, तर एकूण 5,814 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Load More

कोरोना व्हायरस (Coranavirus), लॉकडाऊन, शासन, प्रशासन आणि जनता एकूणच संभ्रमाचे वातावरण आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश आणि जगभरातही. कोरोना व्हायरस सारख्या आजाराचे जगभरावर आलेले संकट आणि निर्माण झालेली अभूतपूर्व स्थिती. या सर्वांमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये एक कोंडी निर्माण झाली आहे. सर्वांचीच स्थिती चुका आणि शिका अशी झाली आहे. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत.

भारतही कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन यांमधून बाहेर पडायचा प्रयत्न करतो आहे. महाराष्ट्र सरकारचाही असाच प्रयत्न सुरु आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप तरी कोणतेही औषध, लस अथवा उपचार निघाला नाही. त्यामुळे कोरोना व्हायरस भीतीची छाया किती काळ राहू शकेल याबाबत साशंकता आहे. अशा स्थिती मिशन बिगिनिंग अगेन म्हणत महाराष्ट्र सरकारने हळूहळू सुरुवात केली आहे खरे. परंतू, नागरिकांच्या मनात अद्यापही भीती कायम असल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळू लागले आहेत. त्याचा परिणाम राज्यातील उद्योग, व्यवसाय आदींवर मोठ्या प्रमाणात होताना दिसू लागला आहे. उद्योगांना कामगार नाहीत, दुकानदारांना ग्राहक नाहीत, उपहारगृहं रिकामी आहेत अशी स्थिती आहे.

दरम्यान, भारत कोरोना व्हायरस संकटाशी तोंड देत असतानाच शेजारी राष्ट्र चीनने पुन्हा एकदा कुरापत काढली आहे. त्यामुळे या देशासोबत पुन्हा एकदा नव्याने संघर्ष सुरु झाला आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, उद्योग या क्षेत्रात काम करण्याचे भारतासमोर आव्हान आहेच. त्यातच चीनच्या संघर्षामुळे तणाव वाढला आहे. स्थानिक, प्रादेशिक, देश-विदेशातील घटना घडोमोडी यांचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडेलेले राहा.


Show Full Article Share Now