पुणे जिल्ह्यात मागील 24 तासांत 1176 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 3,98,607 वर पोहोचली आहे.

इंधन आणि गॅस सिलेंडरच्या वाढत्या दराच्या विरोधात युवा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्रिपुरा येथे आज मोर्चा काढला आहे. ट्वीट-

 

नागपुरातील सीताबुल्डी मुख्य रस्त्यावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याची दिसत आहे. ट्वीट-

 

अहमदाबाद-मुंबई तेजस एक्सप्रेस अंधेरी स्टेशनात थांबली नाही. ही माहिती वरिष्ठांकडे गेल्यानंतर दादर मध्ये ही रेल्वे तातडीने थांबविण्यात आली.

महाराष्ट्रात मागील 24 तासांत 6971 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 21 लाख 884 वर पोहोचली असून मृतांची एकूण संख्या 51 हजार 788 वर पोहोचली आहे.

मुंबईच्या डोंगरी भागात 25 किलोचे मेफेड्रॉन ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला आहे. यात एकाला अटक करण्यात आली आहे.

मुंबईत जोगेश्वरीच्या ट्रॉमा रुग्णालयाजवळची जलवाहिनी वळवण्याचा कामामुळे येत्या 24 आणि 25 तारखेला के/पश्चिम, के/पूर्व आणि पी/दक्षिण परिसरातल्या काही भागात पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात, तर काही भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे.

लॉकडाऊन हवा की नको हे पुढील 8 दिवसांत मला जनतेकडून कळेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

'मी जबाबदार' ही नवीन मोहिम राबवूया असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्यापासून राजकीय मोर्चे, यात्रा, सभांवर काही दिवस बंदी असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Load More

महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत आहे. शनिवारी कोरोनाचे 6 हजारांवर नवे रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यांत कोरोनाच्या रुग्णाची संख्या दुपटीपेक्षा अधिक झाली आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते म्हणाले, साधारणत: सायंकाळी 6 ते सकाळी 9 वाजेपर्यंत हा नाइट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरू आहे.

काल नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सामील झाले होते. त्यावेळी, ‘कोविडचा लढा संपलेला नाही. आपणही व्हीसी वगैरेंच्या माध्यमातूनच भेटतो आहोत. कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपरिक 10 ते 5 ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे’, असे ते म्हणाले.

दुसरीकडे सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णामध्ये नवे म्युटेशन्श सापडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या किंमतीमध्ये वाढ होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. आज मुंबईमध्ये पेट्रोलचा रेट 97 आहे. पुण्यात 96.57, नागपूर 97.13 तर कोल्हापूरमध्ये तो 96.84 चालू आहे.