नुकतेच '2024 हुरून इंडिया अंडर-35' ची (The 2024 Hurun India Under 35s) यादी जाहीर झाली आहे. अनेक भारतीयांनी या यादीत स्थान मिळवले आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या मुलांनीही या यादीत स्थान मिळवले आहे. रिलायन्स रिटेलची नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ईशा अंबानी, 2024 च्या हुरुन इंडिया अंडर 35 यादीमध्ये स्थान मिळवणारी सर्वात तरुण महिला आहे. या यादीत ईशा अंबानीला 31 वे स्थान मिळाले आहे. ईशाचा जन्म 23 ऑक्टोबर 1991 रोजी झाला असून तिचे वय 32 वर्षे आहे. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यालाही या यादीत स्थान मिळाले आहे. त्याने 32 वा क्रमांक पटकावला आहे.
माहितीनुसार, 2024 सालच्या हुरून इंडिया अंडर 35 मध्ये सर्वात तरुण व्यक्ती शेअरचॅटचा अंकुश सचदेवा आहे. मामाअर्थमधील आपल्या कामासाठी गझल अलगचाही या यादीत समावेश करण्यात आला होता. टॉडलची परिता पारेख हिलाही महिला उद्योजकांमध्ये स्थान देण्यात आले आहे, जी सर्वात तरुण महिला वैयक्तिक उद्योजक बनली आहे. (हेही वाचा; Airtel Digital TV Partners with Amazon Prime: एअरटेल डिजिटल टीव्हीची ॲमेझॉन प्राइमसोबत भागीदारी; मिळणार लाइव्ह टी.व्ही आणि प्राइम लाइट फायदे, जाणून घ्या प्लॅन्सच्या किंमती)
हुरून इंडिया अंडर 35 भारतीय उद्योजकांची यादी-
1. अंकुश सचदेवा
2. नितीश सारडा
3. अक्षित जैन
4. चैतन्य राठी
5. जय विजय शिर्के
6. राहुल राज
7. राजन बजाज
8.राघव गुप्ता
9. ऋषीराज राठौर
10. हिमेश सिंग
11. सरांश गर्ग
12. राघव बगई
13. विनोद कुमार मीना
14. अर्जुन अहलुवालिया
15. निशांत चंद्र
16. मनन शहा
17. प्रणव अग्रवाल
18. केशव रेड्डी
19. रोहन नायक
20. सिद्धार्थ विज
21. ऋषभ देसाई
22. मिहिर गुप्ता
23. अलख पांडे
24. अक्षित गुप्ता
25. पालोन मिस्त्री
26. रामांशू माहोर
27. वैभव खंडेलवाल
28. सौरव स्वरूप
29. निशांत के.एस
30. परिता पारेख
31. ईशा अंबानी
32. आकाश अंबानी
33. अजेश अच्युतन
34. बाळा सारडा
35. अमन मेहता
हुरुन इंडिया अंडर 35 ची यादी जाहीर करताना, अनस रहमान जुनैद, एमडी आणि हुरुन इंडियाचे मुख्य संशोधक म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार होत असताना, आमच्या संशोधनाने 35 वर्षांखालील लोकसंख्येच्या गतिशील उद्योजकतेवर प्रकाश टाकला आहे. या तरुण उद्योजकांनी जागतिक आव्हाने, गुंतागुंत, महागाई आणि इतर आर्थिक संकटांचा सामना करून अत्यंत यशस्वी कंपन्या तयार केल्या आहेत. आमच्या अंदाजानुसार, 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या उद्योजकांनी तयार केलेल्या व्यवसायाचे मूल्य सुमारे $10 दशलक्ष आहे. तर, 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अधिक अनुभवी उद्योजकांनी $50 दशलक्ष मुल्यांकन असलेले व्यवसाय तयार केले आहेत, तर काहींनी यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मुल्यांकन असलेले व्यवसाय निर्माण केले आहेत.