अयोध्या येथे 2005 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी चार जणांना जन्मठेपेची शिक्षा, एकाची सुटका
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

अयोध्या (Ayodhya) येथे 2005 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी एकाची सुटका करण्यात आली आहे. आज (18 जून) प्रयागराज विषेश न्यायालयाने याबद्दल सुनावणी केली असून त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रयागराज विशेष न्यायालयात अयोध्या येथे घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध सुनावणी करण्यात आली. या प्रकरणी अटकेत असलेल्या दहशतावाद्यांना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. तर अटकेत असणाऱ्या चार दहशतवाद्यांना तुरुंगाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर 2006 मध्ये त्यांना प्रयागराजच्या विशेष कोर्टाच्या आदेशानंतर प्रयागराज येथीलच सेंट्रल तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. रामजन्मभूमी परिसरात या दहशतवाद्यांनी हल्ला करत धार्मिक दंगल घडवण्याचा प्रयत्न केला होता.

(जम्मू काश्मीर: पुलवामा येथील अरिहल येथे IED हल्ला; 9 जवान जखमी)

5 जुलै 2005 मध्ये सकाळी 9.15 वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांनी रामजन्मभूमी परिसरात बॉम्ब स्फोट घडवून आणला. त्यानंतर जवळजवळ दोन तासांच्यावर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आल्याने त्यामध्ये 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला गेला. तर या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या अन्य जणांना जम्मू-काश्मीर येथून अटक करण्यात आली होती.