60 किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील एकूण 8 हजार 523 नागरिकांना कोरोनाची लस टोचली; 2 मार्चच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Bhakti Aghav
|
Mar 02, 2021 11:51 PM IST
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू आणि गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून येत आहे. या राज्यात 87.25 टक्के कोरोना रुग्ण आढळून आल्याचं दिसून आलं आहे. एकट्या महाराष्ट्रातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 46.39 टक्के इतकी आहे. महाराष्ट्रात दररोज सुमारे 8 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस घेतली. त्यानंतर त्यांनी जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहन केलं.
शिवसेनेने सामना अग्रलेखातून देशातील महागाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर कधी कमी होतील याचा काहीच अंदाज देता येणार नाही, असेही सरकारचं म्हणते. मग मार्च-एप्रिलमध्ये दर कमी होतील असे फुगे हवेत का सोडत आहात? असा प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून मोदी सरकारला विचारला आहे.
दरम्यान, नंदुरबार तालुक्यातील राखीव जंगल आसलेल्या ठाणे पाडा जंगलात रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीमुळे मोठ्या प्रमाणात वन संपत्तीचे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अनेक अडचणी येत आहेत.