अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या राज्यव्यापी एल्गार आंदोलनास प्रहारचा पाठिंबा; 2 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Dec 02, 2020 11:17 PM IST
कोरोना व्हायरसचे जागतिक आरोग्य संकट अद्याप कायम आहे. कोरोना संसर्गाचा धोका कायम असला तरी दररोज 50,000 पेक्षा कमी रुग्ण निर्दशनास येत असून करोडो टेस्ट नियमित केल्या जात आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, भाजप खासदार सनी देओल याला देखील कोविड-19 ची लागण झाली असल्याची माहिती हिमाचल प्रदेशचे ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ. रणजीत ठाकूर यांनी दिली आहे.
मुंबईकडे जाणारी पहिली उपनगरीय गाडी रद्द केल्याने पालघर, सफाळे येथे प्रवाशांनी उत्स्फुर्तपणे रेल रोको केला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, सुरुवातीला अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी सुरु असलेली लोकल सेवेत महिलांनाही परवानगी देण्यात आली. दरम्यान, 3 डिसेंबर पासून रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू होणार होते. मात्र त्यातून मुंबईकडे जाणारी पहिली उपनगरीय गाडी रद्द केल्याने रेले रोको करत प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
आज टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना पार पडणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे मालिका हातातून निसटली असली तरी अखेरचा सामना जिंकून व्हॉईट वॉश टाळण्याचा भारताचा प्रयत्न असेल. मनुका ओव्हल स्टेडियम मध्ये हा सामना रंगणार असून भारतीय वेळेनुसार सकाळी 9.10 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होणार आहे.