कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस येदियुरप्पा यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

बिहारमध्ये आलेल्या पुरामुळे 53 लाख 67 हजार 182 लोक बाधित तर, 13 जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

पुणे शहरात आज नव्याने 1,762 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 57,523 झाली आहे. तर 1,203 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या 18,040  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 2,81,840 झाली असून आज 2,585 टेस्ट घेण्यात आल्या.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची आणि आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरक्षा परिस्थितीबाबत बैठक पार पडली. डीजीपी सुबोध कुमार जयस्वाल आणि मुंबई पोलिस आयुक्त परम बीर सिंह हेही या बैठकीला उपस्थित होते.

राजस्थानमध्ये आज आणखी 1 हजार 167 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 44 हजार 410 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट-

 

मुंबईत कोरोनाचे आणखी 1105 रुग्ण आढळले तर 49 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील COVID19 चा आकडा 1,16,451 वर पोहचला आहे.

उत्तराखंड येथे कोरोनाचे आणखी 146 रुग्ण आढळून आल्याने आकडा 7,593 वर पोहचला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 9509 रुग्ण आढळून आले असून 260 जणांचा आज मृत्यू, राज्यातील COVID19 चा आकडा 4,41,228 वर पोहचला आहे.

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रीयो यांनी अमित शहा यांची भेट घेतली असल्याने त्यांनी काही दिवस सेल्फ आयलोशनमध्ये राहण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.

आँध्र प्रदेशात गेल्या 24 तासात कोरोनाचे आणखी 8555 रुग्ण आढळून आल्याने आकडा 1,58,764 वर पोहचला आहे.

Load More

महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना काल मातृशोक झाला असून आज जालना मध्ये शारदाबाई टोपे यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान मागील 3-4 महिन्यांपासून राजेश टोपे आईचं आजारपण सांभाळत राज्यातील कोरोना परिस्थिती सांभाळत होते. एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ते नाशिक, पुणे दौर्‍यावर होते. अनेक कोरोना हॉटस्पॉटच्या जागीदेखील त्यांनी भेट दिली होती.

दरम्यान मुंबईकडून आता गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. अनेक गावामध्ये मुंबई, पुण्यातून येणार्‍या चाकरमान्यांसाठी 14 दिवस क्वारंटीन राहण्याचे नियम आहेत. तर यामुळे अनेक मुंबई-गोवा मार्गावर देखील मोठी रांग पहायला मिळत आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

सध्या तलावक्षेत्रामध्ये पाणी कमी असल्याने मुंबई- पुण्यामध्ये पाणी कपातीचं संकट घोंघावत आहे. दोन्ही मुख्य शहरांमध्ये पाणीसाठा कमी आहे.