आयपीएल 2020 च्या 54 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा 60 धावांनी पराभव केला: पश्चिम रेल्वे;1 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Chanda Mandavkar
|
Nov 01, 2020 11:31 PM IST
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान जरी घातले असले तरीही काही गोष्टी अनलॉकिंगच्या टप्प्याटप्प्यानुसार सुरु करण्यास परवानगी दिली गेली आहे. याच पार्श्वभुमीवर बिहार येथे विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी बिहार मध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. तर आता दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मदतानासाठी ही राजयकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभेच्या दृष्टीकोनातून बिहार मधील छपरा, समस्तिपूर, ईस्ट छापरान आणि वेस्ट छापरान येथील रॅलीमधून जनतेला संबोधित करणार आहेत.
दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील मुंबईत भाज्यांचे दर गगनाला जाऊन भिडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना अधिक दराने भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत. त्यामुळे परिणामी सामान्यांचे यामध्ये हाल होताना दिसून येत आहेत. मुंबईतील मार्केटमध्ये कोथिंबीरची जुडी 30-40 रुपये दराने विक्री केली जात आहे. तसेच कांद्याने तर शंभरीच्या पार जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे वाढलेले दर पाहता महिन्याभराचे आर्थिक बजेट कोलमडले जाऊ शकते असे ग्राहकांनी म्हटले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
ब्रिटिश पंतप्रधान बोरिय जॉनसन यांनी गुरुवार पासून संपूर्ण इंग्लंड मध्ये महिन्याभरासाठी कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता लॉकडाऊन जाहीर केला आहे.