कोरोना व्हायरससाठी मलेरियाचे औषध Chloroquine उपयोगी ठरू शकते- राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प; 19 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Siddhi Shinde
|
Mar 19, 2020 11:43 PM IST
देशभरातील कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे, काल सुद्धा मुंबई, पुणे, रत्नागिरी येथे कोरोनाचे 4 नवे रुग्ण आढळल्याने आता राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 45 वर पोहचला आहे. तर देशभरातहा आकडा आता 150 च्या पार आहे. याच पार्श्वभूमीवर म्यूख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारतर्फे काही नियम तयार करण्यात आले आहेत, यापूर्वी केवळ शाळा- कॉलेज आणि मॉल्स- हॉटेल्स बंद ठेवण्याच्या निर्णयाला जोडून आता राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी कम करतील.असेही सांगण्यात आले आहे. रेल्वे, एसटी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के क्षमतेने चालवली जाईल. तसेच शहरातील सर्व दुकाने ही Odd- Even दिवसाच्या नियमानुसार सुरु ठेली जातील असेही सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे, कोरोनाच्या भीतीने अनेकांनी चाचण्या करून घेण्यासाठी रुग्णालयात गर्दी केली असल्याने हॉस्पिटल वर दबाव येत असल्याचे आढळून आले होते, यावर उपाय म्ह्णून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची तीव्र लक्षणे आढळून आल्यास किंवा कोरोना व्हायरसची लागण झालेल्या देशातून प्रवास केला असेल, तरच कोरोनाची चाचणी केली जाईल अशी माहिती दिली.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
दुसरीकडे, उद्या 20 मार्च रोजी निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषीच्या फाशीचा दिवस आहे, त्यापूर्वी आज सर्वोच्च न्यायालय दोषी पवन कुमार गुप्तता याच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी घेणार आहे, गुन्हा घडतेवेळी आपण अल्पवयीन असल्याचे म्हणत पवन यांनी आपल्याला फाशी ऐवजी जन्मठेप द्यावी अशी याचिका केली आहे, तर काल दोषी मुकेश याच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, गुन्ह्याच्या वेळी आपण घटनास्थळी उपस्थित नसल्याचा दावा मुकेश याने केला होता.