सुपर ओव्हर मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला आहे.
MI Vs KXIP, IPL 2020: सुपर ओव्हर मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा मुंबई इंडियन्सवर विजय; 18 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सुरु झालेल्या परतीच्या पावसाने ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला चांगला जोर धरला आणि या पावसाने महाराष्ट्राला (Maharashtra Rain Update) चांगलेच झोडपून काढले. या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पाण्याखाली गेले. घरात पाणी शिरल्याने अनेक संसार उघड्यावर पडली. तर शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने बळीराजा दु:खी झाला. यामुळे या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आजपासून 2 दिवस मराठवाडा (Marathwada) जिल्ह्याचा पाहणीदौरा करणार आहेत. अतिवृष्टीमुळे येथील नागरिकांचे झालेल्या नुकसानीचा ते आढावा घेतील. त्यानंतर तेथील प्रशासकीय अधिका-यांसोबत बैठक घेऊन यावर काय तोडगा काढता येईल याबाबत प्रयत्न करतील.
तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (Coronavirus) हैदोस सुरुच आहे. राज्यात काल 10,259 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तर नवीन 14238 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1328606 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 185270 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.65% झाले आहे.
तर मुंबईत आणखी 1 हजार 791 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 40 हजार 339 वर पोहचली आहे.
Nana Patekar Dies: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पार्थिव दर्शनासाठी शरद पवार गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले
Nana Patekar Passes Away: अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यामध्ये हार्ट अटॅक ने मृत्यू
Water Levels in Mumbai Lakes: मुंबईच्या 7 जलाशयांत 95% पाणीसाठा
Water Levels in Mumbai Lakes: मुंबईच्या जलाशयांत 95.50% पाणीसाठा, 24 तासांत साठ्यात घट