Ghaziabad Funeral Tragedy (Photo Credits: Twitter/ANI)

मृत्यू कधी केव्हा कुठे येईल हे सांगणं खरंच खूप अवघड आहे. उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. गाजियाबादमध्ये (Ghaziabad)मुरादनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या जमावावर स्मशानभूमीचे छत कोसळल्याने 17 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून सर्व दिग्गज नेते या घटनेबाबत शोक व्यक्त करत आहेत. तसेच या ढिगा-याखाली अडकलेल्यांपैकी 38 जणांना बाहेर काढण्यात पोलीस आणि एनडीआरएफ जवानांना यश आले आहे. अद्याप बचावकार्य सुरु आहे.

या दुर्दैवी घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंत्यसंस्कारासाठी गेलेले असताना पाऊस आल्याने तेथे आलेले लोक स्मशानभूमीच्या छताखाली उभे राहिले. त्यावेली अचानक काही कळायच्या आता ते छत त्यांच्या अंगावर कोसळले आणि सर्व त्याखाली चिरडले गेले. घटनेची माहिती मिळाताच पोलीस व एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली व बचावकार्य सुरू झालं.हेदेखील वाचा- Uttar Pradesh: प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये एका महिला पोलीस उपनिरीक्षकाची गळफास लावून आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहले मृत्यूचे कारण

या दुर्घटनेबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केलं आहे. “मी जिल्हा अधिकार्‍यांना मदतकार्य राबवण्याच्या व घटनेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घटनेतील पीडित व्यक्तींना सर्वतोपरी मदत केली जाईल” असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे.

तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ही बातमी ऐकून अत्यंत दु:ख झाले. आम्ही मृतांच्या कुटूंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे होवो अशी प्रार्थना केली. अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच या दुर्घटनेतील जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारू दे अशी प्रार्थना केली आहे.