चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सने विजय; 17 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Bhakti Aghav
|
Oct 17, 2020 11:29 PM IST
आजपासून देशभरात नवरात्रोत्सवास सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा नवरात्रोत्सवावर कोरोना विषाणूचं संकट आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात 73 लाखाहून अधिक जणांना या विषाणूची लागण झाली आहे. मात्र, कोरोनाच्या संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे 64 लाखाहून अधिक जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
दरम्यान, आजपासून महिला प्रवाशांना मुंबई आणि उपनगरीय रेल्वे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु, असं असलं तरी मध्य रेल्वे प्रशासनाने सरसकट सर्व महिलांना प्रवासाची परवानगी देता येणार नसल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर गोंधळाचे वातावरण निर्माण झालं आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
याशिवाय राज्यात परतीच्या पावसामुळे पुणे, औरंगाबाद आणि कोकण या तीन विभागांना मोठा तडाखा बसला आहे. या विभागात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे आतापर्यंत 48 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील या परिस्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कल्पना दिली असून पंतप्रधानांनी महाराष्ट्राला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.