17 MPs COVID Positive: मीनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे आणि परवेश साहिब सिंह समवेत 17 खासदार आढळले कोरोना पॉझिटिव्ह, आजपासून सुरु झाले अधिवेशन
Monsoon Session Of Parliament (PC - ANI)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) लांबणीवर पडलेले संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon session 2020) आज सुरु झाले खरे मात्र आज पहिल्याच दिवशी संसद कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकले आहे. आज खासदार मीनाक्षी लेखी (Meenakshi Lekhi), अनंत कुमार हेगडे (Anant Kumar Hegde) आणि परवेश साहिब सिंह (Parvesh Sahib Singh) समवेत 17 खासदारांना कोरोनाची लागण (COVID-19 Positive) झाल्याचे समोर आले आहे. ANI ने याबाबतचे वृत्त दिले असून यात अन्य कोणत्या खासदाराला कोरोनाची लागण झाली आहे ही बातमी अद्याप समोर आलेली नाही.

प्राप्त माहितीनुसार हे पावसाळी अधिवेशन 18 दिवसीय असेल त्यामध्ये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी सुद्धा अधिवेशन भरवले जाणार आहे. या काळात मोदी सरकारने मार्चपासून जारी केलेल्या अध्यादेशांची पुनर्स्थापना करणार्‍या 11 विधेयकांसहित 23 नवीन कायदे विचार आणि चर्चेसाठी मांडले जाणार आहेत. कोरोना संकट लक्षात घेता अधिवेशनाच्या नियमांमध्ये काही विशेष बदल करण्यात आले आहेत. मात्र सद्य परिस्थिती पाहता आता सरकार अधिवेशनास आलेल्या अन्य खासदारांची तपासणी करणार की होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देणार ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. Parliament Monsoon Session 2020: संसदेच्या 18 दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात, कोरोनामुळे यंदा केलेले बदल पाहा

आजचे पावसळी अधिवेशन चांगलेच गाजले. त्यांनतर काही गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज उद्या दुपारी 3 वाजपर्यंत तहकूब करण्यात आले होते. मात्र समोर आलेल्या या धक्कादायक माहितीमुळे आता पुढे काय पाऊलं उचलली जातील ते लवकरच कळेल.

अधिवेशनाच्या पुर्वीच लोकसभेचे पाच खासदार कोरोनाबाधित असल्याचे आढळुन आले होते. विरोधी पक्ष कॉंंग्रेस प्रमुख सोनिया गांंधी या सुद्धा आरोग्य तपासणीसाठी परदेशी गेल्या आहेत खासदार राहुल गांंधी सुद्धा सोनिया यांंच्यासोबत गेले आहेत त्यामुळे विरोधी पक्षाचे दोन्ही मुख्य नेते अधिवेशनात उपस्थित नसतील.