भारतीय सैन्य दलात पहिल्या कोरोना व्हायरस प्रकरणाची पुष्टी; 17 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Siddhi Shinde
|
Mar 17, 2020 11:19 PM IST
जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) घातलेले थैमान भारतात सुद्धा तीव्र स्वरूप धारण करत आहे. आतापर्यंत, देशात 100 हुन अधिकांना या व्हूयर्सची लागण झाली आहे तर याचा सर्वात मोठा फटका हा महाराष्ट्राला बसला असून आतापर्यंत 39 च्या वर कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे, परिणामी महाराष्ट्रात चित्रपटगृह, नाट्यगृह यांच्यासह शाळा, कॉलेज 31 मार्च पर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. तर काल मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर संस्थानाने सुद्धा पुढील सूचना मिळेपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवणार असल्याचे सांगितले.
पुणे शहरात आजपासून पुढील तीन दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व दुकाने बंद राहणार आहेत, यामध्ये रोजच्या वापराच्या वस्तू विकणारी आणि मेडिकल्स मात्र समाविष्ट नसतील. दुसरीकडे, काल पुणे आणि नवी मुंबई येथील काही कोरोना संशयित रुग्णांनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने आता यापुढे विलगीकरण सेंटर मध्ये असणाऱ्या संशयित रुग्णानाच्या हातावर शिक्का मारला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
मध्य प्रदेश सरकारला सादर करायची बहुमत चाचणी सुद्धा या कोरोनामुळे काल लांबणीवर टाकण्याची घोषणा झाली होती मात्र या निर्णयाचं विरुद्ध मध्य प्रदेश भाजप नेते व माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत त्वरित बहुमत चाचणी व्हावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे