22 फेब्रुवारीला भाजपचे राज्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर आंदोलन असणार आहे. शेतकरी कर्जमाफी, महिला अत्याचार व मुंबईमधील झोपडपट्ट्यांचा रखडलेला विकास या विरोधात हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. ह आंदोलन 22 फेब्रुवारी रोजे दिवसभर चालणार आहे. 

एमएसआरडीसीनुसार, सायन फ्लायओवरचे काम मंगळवार सकाळपर्यंत सुरू राहणार आहे. परिणामी, तो सोमवारी बंद राहणार आहे. त्यानुसार प्रवाशांनी आपल्या प्रवासाच्या मार्गाची त्यानुसार योजना करा.  

आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वे अपघातांचा महामार्ग बनत आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाला आहे. उन्नावमधील टोल प्लाझाजवळ ट्रक आणि व्हॅनची जोरदार टक्कर झाल्यानंतर, व्हॅनला आग लागली. या भीषण अपघातात व्हॅनमधील सात लोक जिवंत जळाले आहेत. उन्नावच्या डीएमने सात मृत्यूची पुष्टी केली आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.

यवतमाळ मधील जोडमोहा येथे अंत्यविधीवरून परतणारी  टाटा मॅजिक गाडी झाडावर आदळून खोल नाल्यात उलटल्याने भीषण अपघात झाल्याचे समजत आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत.  

सेलु शहरातुन परभणी येथे जाताना खासगी लक्झरीचं स्टेअरींग रॉड तुटून अपघात झाल्याचेच समजत आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर आठ ते दहा प्रवासी जखमी झाल्याचे समजतेय.  

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या आश्वासनानंतर खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने आंदोलन मागे घेतलं आहे. टोल नाक्यावर चर्चा करण्यासाठी कृती समितीचे शिष्ठमंडळ, सुप्रिया सुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात पुढील आठवड्यात चर्चा होणार आहे. तोपर्यंत आठ दिवसासाठी भोर, वेल्ला, मुळशी, खडकवासला, हवेली, पुरंदर आणि पुणे भागातील वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे   

भारतातील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जामिया इस्लामिया असो सर्वच संस्था या उत्तम आहेत आणि त्यांना मिटवू पाहण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही असे विधान आज केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी केले आहे.

महाराष्ट्र विधानसभेत जनादेशाचा अपमान केल्यानंतर आता औरंगाबाद येथे निवडणुकीत शिवसेना कोणत्या तोंडाने उतरणार आहे, असा सेवा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे तर दुसरीकडे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांसारखी मजबूत भाजप टीम तिथे कार्य करेल म्ह्णून औरंगाबादेत भाजपचा विजय निश्चित आहे असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.  

महाराष्ट्र विधानसभेत जनादेशाचा अपमान केल्यानंतर आता औरंगाबाद येथे निवडणुकीत शिवसेना कोणत्या तोंडाने उतरणार आहे, असा सेवा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे तर दुसरीकडे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांसारखी मजबूत भाजप टीम तिथे कार्य करेल म्ह्णून औरंगाबादेत भाजपचा विजय निश्चित आहे असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.  

गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई येथे भारतीय जनता पक्षाचीच सत्ता येणार आहे असा ठाम विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई अधिवेशनात व्यक्त केला आहे. नवी मुंबईतील भाजपच्या विजयापासून भाजपच्या विजयीरथाची नवी सुरुवात होईल असेही फडणवीस यांनी म्हंटले आहे.  

Load More

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) हॅट्रिक मारत सलग तिस-यांदा दिल्लीच्या रामलीला मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितील आज शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. सकाळी शपथविधी सोहळा सकाळी 10 वाजताच्या दरम्यान सुरू होणार असल्याच्या सुचना सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तर सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत कार्यक्रमाच्या ठिकाणी वाहतुकीचे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. 1 लाख लोकांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सोहळ्यासाठी दिल्ली पोलीस, सीआरपीएफसह अर्धसैनिक दलातील 2000 ते 3000 जवान 24 तास सुरक्षेसाठी तैनात असतील.

केजरीवाल यांच्यासोबत त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री सुद्धा 16 तारखेला शपथ घेणार आहेत. गेल्या सरकारमध्ये मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसैन आणि राजेंद्र पाल गौतम हे त्यांच्या मंत्रीमंडळात होते. शपथविधी सोहळ्यानंतर मंत्र्यांना पद वाटून देण्यात येणार आहेत.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या.

मुंबई मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. या तीनही मार्गांवरील रेल्वे 20 मिनिटे उशिराने धावतील. मुलुंड ते माटुंगा आणि पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान मध्य रेल्वेने आज, रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. सांताक्रूझ ते माहीमदरम्यान पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घोषित केला आहे.