बिहारमध्ये आज 1,385 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.


 

मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत देणार असल्याचं  पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.    

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुणपडताळणी, उत्तरपत्रिका छायांकित प्रती, पुनर्मुल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी प्रथमच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

दिल्ली सरकारने गुटखा, पान मसाल्याच्या निर्मिती, साठवण, वितरण आणि विक्रीवरील बंदी आणखी एका वर्षासाठी वाढविली आहे.

मुंबईतील फोर्ट येथे कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आतापर्यंत 4 जणांचा मृतदेह आढळला आहे.

 

मुंबईच्या भानुशाली इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 60 वर्षाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.

 

आज झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या फोर्ट भागातील भानुशाली इमारतीचा एक भाग कोसळला होता. त्या ठिकाणाहून आतापर्यंत एनडीआरएफच्या पथकाने 13 जणांना बाहेर काढले आहे. या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप बचावकार्य सुरू आहे.

मुंबई येथे एनडीआरएफच्या पथकाने, आज मुसळधार पावसानंतर फोर्ट येथील एका इमारतीचा काही भाग कोसळलेल्या ठिकाणाहून एका व्यक्तीला जिवंत ढिगाऱ्याखालून बाहेर काढले.

मुंबई येथे एनडीआरएफच्या पथकाने, आज मुसळधार पावसानंतर फोर्ट येथील एका इमारतीचा काही भाग कोसळलेल्या ठिकाणाहून एका व्यक्तीला जिवंत ढिगाऱ्याखालून बाहेर काढले.

गोव्यात आज 157 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.  त्यामुळे गोव्यातील कोरोना रुग्णांची संख्या 3,108 इतकी झाली आहे.

 

Load More

महाराष्ट्रामध्ये आज 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास दिवस आहे. आज राज्याचा एचएससी बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान लाखो विद्यार्थ्यांना यंदा ऑनालाईन त्यांचा निकाल दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. कोरोना संकटकाळात यंदा निकाल लावण्याच्या प्रक्रियेला थोडा उशिर झाला आहे.

अमेरिकेमध्ये आज जो बिडेन, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलोन मस्क, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि अ‍ॅपल अशी हाय प्रोफाईल आणि व्हेरिफाईड व्यक्तींची ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

आज सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला असल्याचेही वृत्त देण्यात आले आहे. हा 4.5 रिश्टल स्केलचा भूकंप होता.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान देशामध्ये कोरोनाचा कहर अद्यापही सुरूच आहे. देशामध्ये साडे नऊ लाखांच्या उंबरठ्यावर कोरोनाग्रस्तांची संख्या पोहचली आहे.