लातूर मेडिकल कॉलेजला विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्था नाव देण्यास मान्यता; 15 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Feb 15, 2020 11:49 PM IST
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे स्थानक येथील एका महाविद्यालयाने 'व्हॅलेंटाइन डे'चे निमित्त साधत आपल्या विद्यार्थिनींना चक्क प्रेमविवाह नकरण्याची शपथ दिली. विशेष म्हणजे विद्यार्थिनींनीही ही शपथ घेतली आणि वादाला तोंड फुटले. व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day 2020) म्हणजे जगभरातील लोक आणि खास करुन प्रेमी युगुलांकडून साजरा केला जाणारा हटके उत्सव. भारतात त्याला विरोध आणि समर्थन अशा दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात. दरम्यान, अमरावती येथील शाळेतील प्रकार अनेकांसाठी धक्कादायक होता. या प्रकरणावर समाजातील विविध क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. हा वाद अद्यापही संपला नाही. त्यामुळे आज या वादाचे पडसाद कसे उमटतात त्याबाबत उत्सुकता आहे.
सीएए (CAA) , एनआरसी (NRC) या मुद्द्यांवरु देशभरात रान पेटले असून, त्याच्या समर्थन आणि विरोधात मोर्चे निघत आहेत. आंदोलने होत आहेत. दरम्यान, या सर्वात लक्षवेधी ठरला आहे ते दिल्ली येथील शाहीन बाग आंदोलन. सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात इथे गेली अनेक दिवस आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला देशभरातून अनेक नागरिक, संस्था संघटना पाठिंबा देत आहेत. काही सेलेब्रिटी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरही या आंदोलनाला शाहिन बाग येथे जाऊन पाठिंबा देत आहेत. प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यानेही इथे नुकतीच भेट दिली. दरम्यान, या विषयावर केंद्र सरकार, देशभरातील नागरिक आणि आंदोलक आज काय प्रतिक्रिया देतात, निर्णय घेतात यावरही लेटेस्टली मराठी नजर ठेऊन असणार आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) हा जगभरातील अनेक देशांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. भारताचा शेजारी असलेल्या चीन देशात या व्हायरसचा उगम झाला. एकट्या चीनमध्येच काही हजार लोकांचा बळी कोरोना व्हायरसने घेतला आहे. तर लक्षवधी लोकांना या आजाराची बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस हा सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. भारतातीलही अनेक नागरिक विविध देशांमध्ये, जहाजावर कोरोना व्हायरसमुळे अडकून पडली आहेत. भारत सरकार त्यांच्या संपर्कात आहे. या सर्व घटना घडामोडींचा तपशीलही आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत.
दरम्यान, केवळ अमरावती येथील विद्यार्थिनींची शपथ, सीएए, एनआरसी, कोरोना व्हायरसच नव्हे तर देशातील आर्थिक मंदी सदृश्य स्थिती, महाविकास आघाडी सरकारचे निर्णय, विरोधकांचे राजकारण, शेती, शिक्षण, आरोग्य, जागतिक घडामोडी यांसारख्या विविध विषयांमधील, क्षेत्रांमधील अपडेट्सही आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. म्हणूनच जोडलेले राहा लेटेस्टली मराठीसोबत.