सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर माने, वय 57 यांचा मृत्यू; 15 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Bhakti Aghav
|
May 15, 2020 11:47 PM IST
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 78 हजार पेक्षा जास्त झाली आहे. तसेच 2549 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातदेखील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने नवा उच्चांक गाठला आहे. राज्यात एकाच दिवशी 1602 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या 27,524 झाली आहे. तर काल दिवसभरात 44 कोरोनाबाधितांना जीव गमवावा लागला.
दरम्यान, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक आणि सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. कोरोनाची लढाई सर्वांनी एकत्र मिळून लढली पाहिजे, असं मत मोदी यावेळी मांडलं.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्याचा विचार सरकार करत आहे. यात मुंबई, ठाणे, पुण्यात निर्बंध कायम ठेवत काही प्रमाणात दिलासा देण्याची सरकारची योजना आहे. तसेच आर्थिक व्यवहार सुरू व्हावेत या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन वेगळ्या स्वरुपातील असेल, असं सांगितलं होतं. पंतप्रधान कार्यालयाने राज्यांकडून लॉकडाऊन संदर्भात सूचना मागविल्या आहेत.