Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
5 hours ago

Corona vaccination in Maharashtra: महाराष्ट्रात उद्यापासून कोरोना लसीकरणास प्रारंभ ; 15 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Poonam Poyrekar | Jan 15, 2021 11:55 PM IST
A+
A-
15 Jan, 23:55 (IST)

कोरोना व्हायरस लसीकरण मोहिमेस राज्यात उद्यापासून (शनिवार, 16 जानेवारी 2021) सुरुवात होत आहे. 285 केंद्रांवर ही मोहिम राबविण्यात येईल.

15 Jan, 23:37 (IST)

दिल्ली: धुक्यामुळे राष्ट्रीय राजधानीच्या काही भागांत दृश्यमानता कमी झाली. राजपथ जवळचे फोटो.

15 Jan, 23:28 (IST)

प्रसिद्ध उद्योगपती आणि माजी केंद्रीय मंत्री कमल मोरारका यांचे निधन (Kamal Morarka Passes Away) झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. मुंबई (Mumbai) येथे शुक्रवारी सांयकाळी 6 वाजणेच्या दरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. कमल मोरारका (Kamal Morarka) हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. कमल मोरारका हे 1990-91मध्ये पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये केंद्री मंत्री होते. त्यानंतर ते 1988 ते 1994 पर्यंत ते राजस्थानमधून राज्यसभा सदस्यही राहिले होते.

15 Jan, 22:25 (IST)

राज्यात आज पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीबाबतचा तपशील खालीलप्रमाणे

  1. निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234
  2. आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711
  3. एकूण प्रभाग- 46,921
  4. एकूण जागा- 1,25,709
  5. प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
  6. अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
  7. वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
  8. मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
  9. बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718
  10. अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880
15 Jan, 22:00 (IST)

राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 गावांसाठी ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी 79% मतदान मतदान झाले, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस मदान यांनी दिली आहे.

15 Jan, 21:46 (IST)

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी पुणे व आसपासच्या अनेक ठिकाणी शोध घेत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुन्हेगारी कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत: ईडी

15 Jan, 21:25 (IST)

कोरोना प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या सकाळी 11.30 वाजता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रामध्ये होणार आहे. ट्विट-

 

15 Jan, 21:03 (IST)

कर्नाटकमध्ये आज आणखी 708 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9 लाख 30 हजार 668 वर पोहचली आहे. यापैंकी 12 हजार 158 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 9 लाख 9 हजार 701 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ट्विट

 

15 Jan, 20:47 (IST)

कोरोना लसीकरणासाठी पुणे येथील नोबेल रुग्णालय सज्ज झाले आहे. या रुग्णालयात उद्यापासून लसीकरण मोहिम राबवली जाणार आहे.

15 Jan, 20:45 (IST)

सैन्य दिनाच्या दिवशी सीमा रस्ते संघटनेचे (डीआरओ) मेजर जनरल राजीव चौधरी यांनी 500 किमी रस्त्याने प्रवास केला आणि अरुणाचल प्रदेशातील सेला पास बायपास करण्यासाठी (13,020 फूट उंचीवर) बोगद्याच्या दक्षिण पोर्टलचा पहिला स्फोट घडवून आणला.
.

Load More

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन (Bollywood Drugs Connection) आणि मुंबईत ड्रग्जचे पसरलेले जाळे समोर आले. यात NCB ने अनेक ठिकाणी छापे टाकून लाखों रुपयांचे ड्रग्ज, गांजा यांसारखे अमली पदार्थ जप्त केले आहेत. अशीच कारवाई मुंबई पोलिसांनी मुंबईतील साकीनाका परिसरात केली. या कारवाईत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 345 किलो किंमतीचा गांजा (Ganja) जप्त केला असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. NDPS कायद्यानुसार, याप्रकरणी FIR दाखल करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली असून अधिक तपास सुरु आहे.

दरम्यान आज भारतीय सेना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जवानांना आणि त्यांच्या कुटूंबांना ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. आपली भारतीय सेना खूपच सशक्त असून आपल्याला या गोष्टीचा अभिमान आहे असे ते म्हणाले.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

तसेच दिल्लीतील हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, तर येथील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली.


Show Full Article Share Now