असम येथे आज 142 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 15 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Dec 15, 2020 11:28 PM IST
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचा आज मुंबई हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. काल शोकप्रस्ताव आणि शक्ती विधेयक मंत्रिमंडळात चर्चेसाठी घेण्यात आल्यानंतर आज कामकाजाच्या दिवशी मराठा आरक्षण, कोरोना स्थिती तसेच शेतकर्यांच्या मागण्या यावरून भाजपा सरकारला लक्ष्य करण्याची शक्यता आहे.
दरम्यान आज भारताचे लोहपुरूष वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी वल्लभभाईंना सोशल मीडियामध्ये आदरांजली अर्पण केली आहे.
अमेरिकेमध्ये फायझरच्या लसीला मान्यता मिळाल्यानंतर आता लसीकरण सुरू झाले आहे. काल रात्री न्यूयॉर्कमध्ये एका नर्सला लस देण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतामध्ये फायझरला कधी मान्यता मिळणार? त्यासोबतच स्वदेशी लसीदेखील तातडीने मंजुरी मिळवण्याच्या प्रतिक्षेमध्ये आहेत. त्यामुळे आता भारतीयांचे देखील लसीच्या मंजुरीकडे लक्ष आहे. पहिल्या टप्प्यात भारतामध्ये 30 कोटी लोकांना लस देण्याचा मानस आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
शेतकरी आंदोलन सध्या भारतामध्ये वाढत आहे. यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपली प्रतिक्रिया देताना राजकीय पक्ष केवळ राजकारण करत आहेत. शेतकर्यांना ज्या 3 कायद्यावर आक्षेप आहे त्यावर शेतकरी नेते आणी केंद्रीय कृषी मंत्री चर्चा करून मार्ग काढतील. असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे.