जम्मू आणि काश्मीरः 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रियासी जिल्ह्यातील सालल धरणावर तिरंगा झळकला; 14 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Dipali Nevarekar
|
Aug 15, 2020 12:01 AM IST
मुंबई, ठाणे, पालघर शहरामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. असा अंदाज हवामान वेधशाळेने वर्तवला आहे. त्यानुसार मुंबईत आज सकाळपासूनच अधूनमधून जोरदार सरी बरसण्यासाठी सुरूवात झाली आहे. दरम्यान पश्चिम किनारपट्टीवर असणार्या रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग या परिसरामध्येही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सध्या मागील काही दिवसांपासून पुन्हा मुंबई शहरात पावसाने जोर धरल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावांमध्ये साठ्याची पाणीपातळी वाढली आहे.
दरम्यान उद्या भारतामध्ये 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार असल्याने आज दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अत्यंत साधेपणाने आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडेल. आज स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद देशाला संबोधित करणार आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
भारतामध्ये कोरोना रूग्णामध्ये जशी वाढ होत आहे तशी वाढ त्यामधून ठीक होणार्या रूग्णांमध्येही होत आहे. दरम्यान भारतामध्ये कोरोनाबाधितांची रूग्णसंख्या 24 लाखांच्या उंबरठ्यावर आहे. महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांची संख्या आता 5 लाख 60 हजार 126 इतकी झाली आहे.