MP Suicide Case: मध्य प्रदेशात ऑनलाईन फसवणूक झाल्याने 13 वर्षीय मुलाने केली आत्महत्या
Suicide | Representational Image (Photo Credits: Pixabay)

लहान मुलांनी आत्महत्या (Suicide) केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यात कौटुंबिक त्रासामुळे आत्महत्या केल्या असल्याच्या घटना जास्त घडल्या आहे. दरम्यान अशी मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका मुलाने ऑनलाईन फसवणूक (Online fraud) झाल्याने त्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात (Chhatarpur District) एका 13 वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येनंतर एक सुसाईड नोट मागे ठेवली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की तो ऑनलाइन गेममध्ये (Online games) 40,000 रुपये गमावल्यानंतर कठोर पाऊल उचलत आहे. अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली आहे. पॅथॉलॉजी लॅब मालकाचा मुलगा इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्याने शुक्रवारी दुपारी छतरपूर शहरातील त्याच्या राहत्या घरी आपले जीवन संपवले आहे. किशोरने सुसाईड नोट मागे ठेवली आहे. असे पोलिस उपअधीक्षक  शशांक जैन (Shashank Jain) यांनी सांगितले आहे.

चिठ्ठीत खाजगी शाळेत शिकणाऱ्या मुलाने त्याच्या आईची माफी मागितली आहे. तसेच तो नैराश्यामुळे आत्महत्या करत आहे. त्यात नमूद केले होते. त्याने तिच्या यूपीआय खात्यातून 40,000 रुपये काढले. नंतर फ्री फायर गेमवर पैसे वाया घालवले. यामुळे मी आत्महत्या करत आहे. असे लिहिले होते. त्याची आई राज्य आरोग्य विभागात काम करणारी परिचारिका आहे. त्यावेळी ती जिल्हा रुग्णालयात गेली होती. त्याचे वडीलही घरी नव्हते. तेव्हा अल्पवयीनाने हे टोकाचे पाऊल उचलले, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

आईच्या खात्यावरून आर्थिक व्यवहाराबाबत तिच्या फोनवर अलर्ट मिळाल्यानंतर मुलाच्या आईने फोन करून त्याला फटकारले होते. त्यानंतर मुलाने स्वतःला एका खोलीत बंद केले. काही वेळानंतर, त्याची मोठी बहीणीला ते दार उघडत नसल्याचे आढळले. तिने तिच्या पालकांना याबद्दल माहिती दिली. मुलाला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. जेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नंतर जेव्हा खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा मुलगा स्कार्फ वापरून छताच्या पंख्याला लटकलेला आढळला. असे पोलिसांनी सांगितले. हा मुलगा ऑनलाईन गेमवर स्वेच्छेने पैसे खर्च करत होता. त्याला इतर कोणाकडून धमकी दिली जात होती की नाही हे तपासण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.अशीच एक घटना यावर्षी जानेवारीमध्ये मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील धाना शहरात घडली होती. ज्यामध्ये 12 वर्षांच्या मुलाने वडिलांनी मोबाईल फोन काढून घेतल्यानंतर स्वत: ला गळफास लावून घेतला होता.