कर्नाटक: कलाबुरागी पोलिसांनी छापा टाकून सुमारे 223 किलो, जवळजवळ 10.5 लाख रुपयांचा गांजा जप्त केला; 13 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Siddhi Shinde
|
Sep 13, 2020 11:48 PM IST
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांंना काल, शनिवार, 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पुन्हा एकदा श्वसनाचा त्रास होत होता, रात्रीपर्यंत त्यांंची तब्येत इतकी खराब होत गेली की सुमारे 11 वाजता त्यांंना दिल्लीच्या AIIMS हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. यापुर्वी अमित शाह यांंना कोरोनाची लागण झाली होती त्यावर मात केल्यावर सुद्धा काही दिवस त्रास होत असल्याने त्यांंना AIIMS मध्ये ठेवण्यात आले होते, आता पुन्हा एकदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे अमित शाह रुग्णालयात आहेत मात्र डॉक्टरांंनी काळजी करण्याचे कारण नाही असे सांंगितले आहे.
आज देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठीची NEET परीक्षा सुरु होणार आहे, देशभरातील 15 लाख तर महाराष्ट्रातील 2,28,214 विद्यार्थी 615 केंद्रावर ही परीक्षा देणार असल्याचे समजतेय. यावेळी परिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना आवश्यक ती सगळी सुरक्षा पुरवली जाणार आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, देशातील कोरोना व्हायरस रिकव्हरी रेट संदर्भात आरोग्य मंंत्रालयाने एक दिलासादायक माहिती दिली आहे. सप्टेंंबर महिन्यात देशात प्रतिदिन 70,000 रुग्ण कोरोनावर मात करत आहेत, तसेच एकुण रिकव्हरी ही जवळपास 36 लाखांंच्यावर आहे, जी की अॅक्टिव्ह रुग्णांंच्या तुलनेत 3.8 पट जास्त आहे.