दिल्ली येथे आज आणखी 7 हजार 802 नव्या रुग्णांची नोंद, 91 मृत्यू; 13 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Chanda Mandavkar
|
Nov 13, 2020 11:44 PM IST
देशात आजपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. तर सर्वत्र आजच्या दिवशी धनतेरस साजरा केली जाणार आहे. हिंदूंसाठी धनतेसरचा दिवश शुभ मानला जात असून धन्वंतरीची पूजा केली जाते. तर सोशल मीडियात धनरतेसरच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या जात आहेत. दिवाळीची पहिली पहाट उद्या असणार असल्याने सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पुढील 3-4 दिवस दिसणार आहे. याच पार्श्वभुमीवर गुजरात मधील राजकोट येथील एका आर्ट गॅलरी मध्ये रांगोळी कलाकार महिलेने 100 विविध रांगोळ्या काढत आपली कला सादर केली आहे.
दुसऱ्या बाजूला अद्याप कोरोनाचे सावट देशावर कायम असून यंदाचा दिवाळीचा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. काही राज्यांनी फटाके विक्री किंवा फोडण्यावर बंदी घातली आहे. पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करावा असे ही म्हटले आहे. तर दिवाळीचा सण आणि दिल्लीतील प्रदुषण पाहता तेथील नागरिकांना आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. दिल्लीतील वायुची गुणवत्ता अधिक खराब झाल्याचे पहायला मिळत आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, सिरम इन्स्टिट्युटची कोविशील्ड लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. अंतिम टप्प्यातही ही लस पास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महिन्याअखेरपर्यंत कोविशील्ड लसीची चाचणी पूर्ण होईल. त्यामुळे कोरोना संसर्गावरील लस लवकरच उपलब्ध होणार आहे.