Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
32 minutes ago

Coronavirus: राज्यभरातील 71 शासकीय रक्तपेढ्यांची Facebook च्या रक्तदान मोहिमेच्या व्यासपीठावर नोंदणी करणार- डॉ. प्रदीप व्यास; 13 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Siddhi Shinde | Jun 13, 2020 11:55 PM IST
A+
A-
13 Jun, 23:55 (IST)

राज्यभरातील 71 शासकीय रक्तपेढ्यांची #Facebook च्या रक्तदान मोहिमेच्या व्यासपीठावर नोंदणी करणार. त्यानंतर एखाद्या रक्तपेढीला रक्ताची गरज भासल्यास ती पेढी फेसबुक पेजवर तशी मागणी करेल आणि शहरातील रक्तदात्यांना रक्तदानाबाबत संदेश जाईल अशी माहिती प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.
ट्विट

ट्विट

13 Jun, 23:07 (IST)

मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांचा उद्याचा रायगड दौरा रद्द झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर आले होते. नुकसानग्रस्तांना साहित्यवाटप करण्यासाठी मुख्यमंत्री रायगडला जाणार होते. मात्र, आलिबाग आणि मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असल्याने हा दौरा रद्द झाल्याचे समजते. दरम्यान, दौरा रद्द झाल्याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

13 Jun, 22:55 (IST)

मध्यप्रदेश राज्यातील शहडोल जिल्ह्यात मातीचा ढिगारा कोसळल्याने सहा मजूर ठार झाले तर 4 जण जखमी झाले. संबल योजनेंतर्गत (Sambal Scheme) मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपये देण्यात येणार आहेत. मृतांच्या अंतिम संस्कारार्थ प्रत्येकी 10,000 रुपये देण्यात आले आहेत, अशाी माहिती अतिरिक्त एसपी प्रतिमा मॅथ्यू यांनी दिली आहे.

13 Jun, 22:26 (IST)

लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. तरीही काही समाजकंटक लॉकडाऊन विषयी बनावट बातम्या/अफवा पसरवत आहेत. अश्या अफवा पसरवणाऱ्या लोकांवर महाराष्ट्र सायबर कायदेशीर कारवाई करणार, असल्याचे महाराष्ट्र सायबर सेलने म्हटले आहे.

13 Jun, 22:01 (IST)

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांना लखनऊ येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ताप आल्याने आणि युरिन ट्रॅक्टमध्ये संसर्ग असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.

13 Jun, 21:47 (IST)

जतिन तालुकादार नावाचा एक युवक पोपटासाठी गिटार वाजवत आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायल झाला आहे.

13 Jun, 21:13 (IST)

मुंबई शहरात पावसाचे आगमन झाले आहे. प्रामुख्याने ठाणे, मुंलूंड परिसरात पाऊस दमदार बरसणार असे दिसते. आज दिवसभरच पावसाच्या सरी थोड्याफार प्रमाणत कोसळत होत्या. मात्र सायंकाळनंतर ठाणे परिसरात पावसाच्या सरी दीर्घकाळ कोसळताना दिसत आहेत.

13 Jun, 20:48 (IST)

गोव्यात आज कोरोनाचे नव्याने 60 रुग्णांची भर पडल्याने आकडा 523 वर पोहचला आहे.

13 Jun, 20:33 (IST)

मुंबईत आज कोरोनाचे 1383 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 69 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे शहरातील COVID19 चा आकडा 56740 वर पोहचला आहे.

13 Jun, 20:22 (IST)

हरियाणा येथे आणखी 415 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 6749 वर पोहचला आहे.

Load More

महाराष्ट्रात हवामान खात्याने (Monsoon Update) वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनने (Monsoon) लँडफॉल (Landfall) केला असून तो आता रत्नागिरीच्या (Ratnagiri)  हर्णे पर्यंत मान्सून पोहोचला आहे. आज व उद्या म्हणजेच 13 व 14 जून या 48 तासांत उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा मान्सून दाखल होणार आहे. मुंबईत (Monsoon In Mumbai) सुद्धा आज पावसाचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री पासून उपनगरात काही ठिकाणी पाऊस सुरु झाला होता.

दुसरीकडे, महाराष्ट्रात शुक्रवार 12 जून, रात्री 10 पर्यंत एकूण 1,01,141 कोरोनाबाधित आढळले असुन यापैकी 47796 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, 3717 जणांचा कोरोनाविरुद्ध लढाईत बळी गेला आहे. राज्यात सध्या 49616 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु असून यातील गंभीर प्रकृती असलेल्यांचा टक्का फारच कमी आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी धार्मिक स्थळ, मॉल्स आणि हॉटेल संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. वाचा सविस्तर

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

देशांत कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,97,535 वर पोहोचली आहे. यापैकी मृतांचा एकूण आकडा 8498 वर पोहोचला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिली आहे. भारतात सद्य घडीला 1,41,842 रुग्णावंर उपचार सुरु असून 1,47,195 रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.


Show Full Article Share Now