Union Health Minister Dr. Harsh Vardhan (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहे. राज्य सरकारला विविध प्रकारे मदत करणाऱ्या केंद्र सरकारने आतापर्यंत तब्बल 11300 मेक इन इंडिया व्हेंटिलेटर्स (Make In India Ventilators) पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 6154 व्हेंटिलेटर्स हॉस्पिटल्समध्ये पोहचले आहेत.  तसंच आरोग्य मंत्रालयाकडून 1.02 लाख ऑक्सिजन सिलेंडर्स (Oxygen Cylinders) संपूर्ण देशभरात पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 72,293 सिलेंडर्स डिलिव्हर झाले आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन (Union Health Minister Dr. Harsh Vardhan) यांनी केली आहे. (मागील 24 तासांत 22,771 रुग्णांच्या मोठ्या वाढीसह देशातील कोरोना बाधितांचा आकडा 648315 वर)

भारतात कोरोना व्हायरस दाखल झाल्यानंतर हळूहळू त्याची व्याप्ती वाढू लागली. वेळीच लॉकडाऊन केल्यामुळे कोविड-19 ची साखळी तोडण्यात यश आले. मात्र रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज असणे आवश्यक आहे. त्यामुळे देशातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश यांना आतापर्यंत 2.02 कोटीहून अधिक N95 मास्क, 1.18 कोटीपेक्षा जास्त PPE कीट्स, 6.12 कोटीहून अधिक HCQ टॅबलेट्स आणि 11,300 व्हेंटिलेटर्सचे मोफत वाटप केले आहे.

ANI Tweet:

दरम्यान देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. मागील 24 तासांत कोविड-19 चे 22,771 नवे रुग्ण आढळले असून 442 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 648315 वर पोहचला आहे. त्यापैकी 235433 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून 394227 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात 18655 रुग्ण कोरोना संसर्गामुळे दगावले आहेत