असममधील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी भर; पाहा आजची आकडेवारी; 11 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Poonam Poyrekar
|
Dec 11, 2020 11:52 PM IST
काही दिवसांपूर्वी CCIM ने अधिसूचना जारी केली होती, ज्यात आयुर्वेदातील पदव्युत्तर पदवीधारकांना सामान्य शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली होती. या निर्णयाच्या विरोधात आयएमएने (IMA) संप पुकारला आहे. या संपात देशभरातील सर्व डॉक्टर सहभागी (Doctor's Strike) होणार आहेत. आज सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत सर्व गैर-आपत्कालीन आणि गैर-कोविड वैद्यकीय सेवा बंद असतील. आयएमएने मॉडर्न मेडिसिनच्या सर्व डॉक्टरांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. डॉक्टरांच्या या देशव्यापी संपादरम्यान आयसीयू आणि सीसीयूसारख्या आपत्कालीन सेवा सुरू राहतील. मात्र, पूर्व-नियोजित ऑपरेशन्स केली जाणार नाहीत. आयएमएने सूचित केले आहे की येत्या काही आठवड्यांत हा निषेध तीव्र होऊ शकतो. आयएमएच्या पुकारलेल्या संपाच्या वेळी खासगी रुग्णालयांमधील ओपीडी बंद राहील, परंतु सरकारी रुग्णालये खुलीच राहणार आहेत.
दरम्यान देशात कोरोना बाधितांच्या (Coronavirus) संख्येत देखील वाढ होत आहे. कालच्या (10 डिसेंबर) दिवसात भारतात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 97,67,372 इतकी झाली आहे. मृतांची एकूण संख्या 1,41,772 इतकी झाली आहे. भारतात सद्य स्थितीतील कोरोना रुग्णांची संख्या 3,72,293 इतकी आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर महाराष्ट्रात कोरोना बाधितांची एकूण संख्या राज्यात काल 3824 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर नवीन 5008 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1747199 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 71910 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.52% झाले आहे.