भारतात 7703 कोरोना बाधित रुग्ण; ICMR; 11 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Apr 11, 2020 11:58 PM IST
कोरोना व्हायरस (Coranavirus) संकट नियंत्रणात आणण्यासाठी देशभरात निकराचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे जगाच्या तुलनेत कोरोना व्हायरस संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी भारताला काही अंशी यश आल्याचे चित्र आहे. मात्र, हे चित्र किती वास्तवातले किती फसवे हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. कारण, देशभरातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढते आहे. महाराष्ट्रात ही संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातही मुंबई आणि पुणे शहरात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संसर्ग झालेले रुग्ण आढळत आहेत याला महाराष्ट्र सरकार नागरिकांची कोरोना टेस्ट अधिक प्रमाणात करत असल्याचेही कारण दिले जात आहे. पण, हे कारण खरे असले तर मग देशभरातील इतर राज्यांमध्ये कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या कमी आहे. त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यामुळे आज संबंध दिवसभरात देशभरातील कोरोना व्हायरस संकट आणि स्थिती याबाबततची ताजी माहिती आणि तपशील याकडे विशेष लक्ष असणार आहे.
कोरोना व्हायरस संकट मोठे अव्हान बणून राहिल्यामुळे सहाजिकच देश आणि राज्यातील विविध गोष्टींकडे फारसे लक्ष दिले जात नाही असे दिसते. यात कोरोना व्हायरस संसर्ग नसलेल्या पण, इतर आजार असलेल्या सर्वसामान्य नागरिकांवर होणारे उपचार. त्यांना येणाऱ्या अडचणी हा मुद्दा फारसा चर्चेत आला नाही. मात्र, वास्तवात सर्वसामान्य आजार असलेल्या आणि उपचार मिळत नसलेल्या नागरिकांचेही प्रमाण मोठे आहे.
राज्यातील राजकीय पक्षांचे नेमके काय चालले आहे. काही नेते कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांवर भाष्य करत आहे. याचे प्रमाण कमी असले तरी असे घडते आहे. दुसऱ्या बाजूला लॉकडाऊन काळात काही प्रशासकीय अधिकारी आपल्या अधिकारांचा वापर करत काही नागरिकांना सूट देत आहेत. त्यामुळे अशा काही आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम असलेल्या नागरिकांचा प्रवास खंडाळा ते लोनावळा असाही होतो आहे. अशा काही घटनांकडेही लक्ष असणार आहे.
दरम्यान, भारतासोबतच भारताचे शेजारी देश आणि जगभरात महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका. या देशाच्या खालोखाल जगभरात श्रीमंत आणि विकसित देश अशी ओळख असणारे इतर काही देश ज्यात इंग्लंड, जर्मनी, फ्रांन्स या देशांचा समावेश होतो. यांसह जगभरातील इतर देशांमध्ये कोरोना व्हायरस संकटाबाबत काय स्थिती आहे याकडेही लेटेस्टली मराठी लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे या विविध विषयांतील ताज्या बातम्या, घटना आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगशी जोडलेले राहा.