राज्यातील अनुसूचित जमातींच्या कल्याणासाठी देण्यात आलेल्या निधीचा गैरवापर केल्याच्या, 123 अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यास महाराष्ट्र सरकार असमर्थ असल्याबद्दल, मुंबई हायकोर्टाने व्यक्त केली नाराजी.

आज विधानभवनात सभापती रामराजे निंबाळकर आणि नाना पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. यामध्ये दि 24 फेब्रुवारीपासून विधिमंडळाचे 2020 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. अधिवेशनाचा कालावधी चार आठवड्यांचा निश्‍चित झाला आहे.. यात 18 दिवस कामकाज होणार असून, गुरुवार, दि. 6 मार्चला 2020-21 वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार. दि. 24 फेब्रुवारीला पुरवणी व अतिरिक्त मागण्या सादर होणार व पाच प्रस्तावित शासकीय विधेयके मांडण्यात येणार.

आज जामिया येथे झालेल्या निषेधानंतर, निदर्शकांविरोधात न्यू फ्रेंड्स कॉलनी पोलिस ठाण्यात आयपीसी कलम 186, 188, 353, 332 कायद्यान्वये दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांची संकल्पना आणि वन विभागाच्या सहकार्याने पालवनच्या उजाळ माळराणावर, फुललेल्या सह्याद्री देवराई प्रकल्पावर दिनांक 13 व 14 फेब्रुवारी 2020 रोजी जगातील पहिले वृक्ष संमेलन आयोजित

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत करण्यात येणार आहे. तसेच कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. 

वजन कमी करणाऱ्या गोळया घेतल्यानंतर काही तासातच ठाण्यामध्ये एका तरुण मुलीचा मृत्यू झाला आहे.  मेघना देवगडकर (वय, 22) असे मृत मुलीचे नाव आहे. मेघना जीममध्ये ट्रेनर म्हणूनही काम करत होती.  

पुण्यात विद्यार्थिनीवर अॅसिड टाकण्याची धमकी देऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या आईने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपीला पुणे पोलिसांकडून तात्काळ अटक करण्यात आली आहे. 

नाशिकमध्ये कौटुबिंक वादातून एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पंचवटी पोलिस ठाण्याबाहेर या महिलेने स्वत: ला पेटवून घेतलं आहे. या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.    

हिंगणघाट जळीत हत्याप्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

पिंपरी महापालिका, रुग्णालय आणि शाळांमध्ये प्लास्टिकवर बंदी करण्यात आली आहे. प्लास्टिकचा वापर आढळल्यास विभागप्रमुखांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. 

Load More

गेल्या कित्येक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र ज्या जळीत कांडाने पेटून उठला होता त्या घटनेतील पीडितेचा आज सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही तरुणी मृत्यूशी झुंज देत होती. आज सकाळी 6.55 मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली. डॉ. अनुप मरार यांनी ही ANI शी बोलताना ही माहिती दिली. या पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिची निर्घृण रित्या हत्या करणा-या आरोपी विकेशला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची वर्धा कारगृहात रवानगी करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी गुप्तता पाळत आरोपीला न्यायालयात हजर केले.

तसेच जगातील सर्वात मानाचा समजला जाणारा ऑस्कर 2020 पुरस्कार सोहळा लॉस एन्जेलिस मध्ये रंगला. हा 92 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा आहे. यात 'वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड' ला प्रोडक्शन डिझाइन विभागात पुरस्कार मिळाला. तर ब्रॅड पिट ला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला. जॅकलीन दुरान ही 'लिटिल वूमन' सिनेमासाठी बेस्ट कॉस्च्युम डिझाइन ऑस्करची मानकरी ठरली.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या.

उद्या दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 चा निकाल लागणार असून सर्व उमेदवारांसह संपूर्ण देशाला या निकालाची उत्सुकता लागली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षाचे पारडे जड होणार आणि जनमताचा कौल कुणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.